Join us

​ नरगिसचा बॉलिवूडला कायमचा रामराम??

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2016 2:25 PM

बॉयफ्रेन्ड उदय चोपडासोबत झालेले ब्रेकअप, त्याने लग्नास दिलेला नकार आणि नर्वस ब्रेकडाऊनमुळे नरगिस फखरी अचानक अमेरिकेला निघून गेल्याच्या बातम्या ...

बॉयफ्रेन्ड उदय चोपडासोबत झालेले ब्रेकअप, त्याने लग्नास दिलेला नकार आणि नर्वस ब्रेकडाऊनमुळे नरगिस फखरी अचानक अमेरिकेला निघून गेल्याच्या बातम्या आपण मध्यंतरी ऐकल्या. ‘अजहर’ आणि ‘हाऊसफुल ३’ यासारख्या महत्त्वपूर्ण चित्रपटांचे प्रमोशन अर्ध्यावर सोडून नरगिस  तिच्या कुटुंबाकडे अमेरिकेला रवाना झाली होती. या बातमीनंतर आता नरगिसच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, एका आॅनलाईन पोर्टलने केलेल्या दाव्यानुसार,बॉलिवूडमधील फिल्मी करिअर सोडण्याचा निर्णय नरगिसने घेतला आहे. त्यामुळे कदाचित नरगिस यापुढे भारतात वा हिंदी चित्रपटात दिसणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरगिस आता अमेरिकेतील तिचे कुटुंब आणि मित्रांसोबत राहू इच्छिते. बॉलिवूडला कायमचा राम राम ठोकण्याचा निर्धार तिने केलाय..वेल,शेवटी निर्णय नरगिसचा आहे. पण नरगिसच्या तमाम चाहत्यांसाठी ही बातमी निश्चितपणे धक्कादायक आहे.