Join us  

रणबीर कपूरला लेकीने केलं kiss, राहाच्या क्युटनेसने पुन्हा लक्ष वेधलं; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 12:53 PM

रणबीर कपूर आणि आलिया भट रात्री 2 वाजता अंबानींच्या फंक्शनवरुन मुंबईत परत आले

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhat) यांची लाडकी राहाने (Raha Kapoor) पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. रणबीर आणि आलिया नुकतेच अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यावरुन परतले. इटलीतील भव्य क्रुझवर हा सोहळा झाला. एअरपोर्टवर येताच पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले. यावेळी रणबीरच्या कडेवर असलेल्या छोट्या राहाचीही झलक दिसली. राहाने दोन वेळा रणबीरच्या गालावर kiss केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रणबीर कपूर आणि आलिया भट रात्री 2 वाजता अंबानींच्या फंक्शनवरुन मुंबईत परत आले. अनेक सेलिब्रिटी याचवेळी मुंबईत आल्याने पापाराझींची कलिना विमानतळाबाहेर गर्दी होती. यावेळी रणबीर राहाला कडेवर घेऊन येताना दिसला तर आलिया मागून चालत येत होती. यावेळी राहा रणबीरला गालावर किस करताना दिसली. तिचा हा क्युट अंदाज पाहून नेटकरी पुन्हा राहाच्या क्युटनेसचे चाहते झाले. राहाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

आणखी एका व्हिडिओत हे तिघेही कारमध्ये बसलेले दिसत आहेत. बाहेरुन पापाराझींच्या कॅमेऱ्याचे फ्लॅश येत आहेत. राहा अगदी कुतुहलाने बाहेर पाहताना दिसते. तसंच बघून हसतेही. रणबीर पापाराझींना फ्लॅश ऑफ करण्याची विनंती करतो. तर आलिया राहाचा चेहरा लपवताना दिसते. 

आलिया 2022 साली नोव्हेंबर महिन्यात राहाला जन्म दिला. गेल्या वर्षी ख्रिसमसला राहाला पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आणण्यात आले. तेव्हा ती नक्की कोणासारखी दिसते यावरुन चर्चा सुरु झाल्या. गोरीपान त्वचा, निळे डोळे यामुळे अनेकांनी तिची तुलना ऋषी कपूर, राज कपूर यांच्याशीही केली. 

टॅग्स :रणबीर कपूरपरिवारसोशल मीडियाआलिया भट