Join us

'आशिकी' फेम राहुल रॉय यांना हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, घरीच सुरु राहणार उपचार

By गीतांजली | Published: December 09, 2020 12:11 PM

कारगिलमध्ये 'एलएसी'च्या शूटिंग दरम्यान अभिनेता राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक आला होता.

गेल्या महिन्यात कारगिलमध्ये 'एलएसी'च्या शूटिंग दरम्यान अभिनेता राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. राहुल रॉय यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिग्दर्शक नितीनकुमार गुप्ता यांनी सोमवारी सांगितले की, डॉक्टरांनी राहुलला हॉस्पिटलमधून घरी सोडले आहे. राहुल यांच्यावर पुढील काही दिवस घरीच उपचार सुरु  राहतील.

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसात राहुल रॉय 'एल ए सी- लाइव्ह द बॅटल' चित्रपटाचे कारगिलमध्ये शूटिंग करत होते. शूटिंग दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. ज्यानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहुल रॉय यांच्यासोबत काम करणारा अभिनेता निशांत मलकानी म्हणाला की, 'हे सर्व गेल्या मंगळवारी घडले. ते सोमवारी रात्री झोपताना ठीक होते. त्यांना वातावरणामुळे हा त्रास झाला असेल, असे मला वाटते. जिथे आम्ही शूटिंग करत होतो, तिथले तापमान मायनस १५ डिग्री सेंटीग्रेड होते.' एल ए सी- लाइव्ह द बॅटल या चित्रपटात निशांत मलकानी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार आहे.

\

राहुल रॉयने १९९० मध्ये 'आशिकी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यावेळी तो लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्यानंतर त्याने ४७ सिनेमे साइन केले होते. पण आशिकीनंतर त्याची जादू चालू शकली नाही आणि तो लाइमलाइटपासून दूर गेला. 

टॅग्स :राहुल रॉय