तमन्ना भाटिया (tamannah bhatia) ही बॉलिवूड आणि साऊथ मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. तमन्नाला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. तमन्ना २०२४ मध्ये फक्त एका गाण्याने चांगलाच धुमाकूळ केला. ते गाणं म्हणजे 'स्त्री २' (stree 2) सिनेमातील 'आज की रात'. या गाण्यात तमन्नाने साकारलेल्या अदांचं चांगलंच कौतुक झालं. 'आज की रात' गाणं विसरायला लावणारं तमन्नाचं नवीन गाणं भेटीला आलं आहे. नशा असं या गाण्याचं नाव असून 'रेड २' सिनेमात हे गाणं दिसणार आहे.
तमन्ना भाटियाचं नवीन गाणं
'रेड २' मधील तमन्ना भाटियाचं नशा गाणं रिलीज झाल्यावर हे गाणं अल्पावधीत व्हायरल झालंय.अवघ्या २ तासांमध्ये या गाण्याला ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 'रेड २' मधील हे गाणं एक स्पेशल साँग असून सिनेमाच्या शेवटी हे गाणं दिसणार आहे. तमन्नाच्या सुंदर अदांनी या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. नशा गाणं पाहून तमन्नाचं आज की रात हे गाणं सर्वांना विसरायला होईल, यात शंका नाही. तमन्ना या गाण्यात खूप सुंदर दिसतेय.
रेड २ कधी रिलीज होणार
'रेड २' सिनेमाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालाय. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. रितेश देशमुख आणि अजय देवगण यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यास सर्वांना मजा येतेय. रितेश या सिनेमाच्या माध्यमातून खलनायकी भूमिकेत दिसणार आहे. अजय-रितेशसह सिनेमात वाणी कपूर अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. 'रेड २' हा सिनेमा १ मे रोजी रिलीज होणार आहे. याच सिनेमात तमन्नावर चित्रित झालेलं नशा गाणं दिसणार आहे.