Join us

Raid 2 Trailer: अमेय पटनायकची ७५ वी रेड यशस्वी होईल? अजयसमोर रितेशच्या 'दादाभाई'चं तगडं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 14:24 IST

Raid 2 Trailer Release:अजय देवगण-रितेश देशमुखच्या आगामी रेड २ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बातमीवर क्लिक करुन बघाच (raid 2)

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये एका सिनेमाची चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे 'रेड २'. काही दिवसांपूर्वी 'रेड २' (Raid 2) सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. टीझरपासूनच 'रेड २'च्या ट्रेलरची सर्वजण वाट पाहत होते. अखेर आज मुंबईत 'रेड २'चा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. अजय देवगणच्या (Ajay Devgn) आणि 'रेड २' सिनेमातील इतर कलाकारांच्या उपस्थितीत हा ट्रेलर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. 'रेड २'च्या ट्रेलरमध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) अभिनयाची खास जुगलबंदी पाहायला मिळतेय.

'रेड २'चा ट्रेलर

रेडच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की लखनऊ शहरातील ताऊजींच्या घरी अमेय पटनायक यशस्वी छापा मारुन त्यांना जेरबंद करतो. 'रेड २'मध्ये हेच ताऊजी आता जेलमधून अमेय पटनायकच्या सर्व हालचालींची माहिती घेत असतात. ७४ यशस्वी रेड करणाऱ्या अमेय पटनायक आता ७५ वी रेड मारण्यास सज्ज असतो. दादाभाईच्या घरी अमेय पटनायक त्याच्या साथीदारांसह रेड मारायला येतो. पण दादाभाईच्या हुशारीपुढे अमेय ही रेड मारण्यात यशस्वी होणार की अयशस्वी हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल. 'रेड २'मध्ये रितेशने दादाभाईची खलनायकी भूमिका उत्कृष्टपणे रंगवलेली दिसतेय.

'रेड २' कधी रिलीज होणार

एकूणच अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या अभिनयाची जुगलबंदी 'रेड २'मध्ये बघायला मिळणार आहे. या दोघांशिवाय सिनेमात वाणी कपूर, सौरभ शुक्ला हे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. १ मे २०२५ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सर्वांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे. 'रेड'चा पहिला भाग यशस्वी झाला होता. त्यामुळे 'रेड २' ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे सिनेमा रिलीज झाल्यावर कळून येईलच.

टॅग्स :रितेश देशमुखअजय देवगणवाणी कपूरबॉलिवूड