‘रईस’चा ‘तो’ प्रमोशन इव्हेंट शाहरूख खानला भोवणार! गुन्हा दाखल होण्याची शक्यता!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2017 5:03 AM
‘रईस’ या चित्रपटाच्यावेळीचा एक प्रमोशनल इव्हेंट किंगखान शाहरूख खानला चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे. होय, ‘रईस’च्या प्रमोशनसाठी शाहरूखने आॅगस्ट ...
‘रईस’ या चित्रपटाच्यावेळीचा एक प्रमोशनल इव्हेंट किंगखान शाहरूख खानला चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे. होय, ‘रईस’च्या प्रमोशनसाठी शाहरूखने आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेसने मुंबई ते दिल्ली असा प्रवास केला होता. पण गाडी वडोदरा स्थानकात पोहोचताच शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उतावीळ झालेत आणि यांनी रेल्वेचं अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे स्थानकात एकच गोंधळ माजला. पोलिसांनाही गर्दी आवरणे कठीण होऊन बसले. अखेर गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करत लाठीमार करावा लागला होता. त्यामुळे चेंगराचेंगरीही झाली होती. या चेंगराचेंगरीत फरीद खान यांनाही धक्काबुक्की होऊन ते जमिनीवर कोसळले होते. शिवाय त्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या चेंगराचेंगरीत पोलिसांसह अन्य चार जण जखमी झाले होते. ALSO READ : WATCH Video : अन् रिअॅलिटी शोतील टास्कमुळे असा भडकला किंगखान शाहरूख खान!या प्रकरणी पश्चिम रेल्वेचे पोलीस उपअधिक्षक तरूण बरोत यांनी शाहरूख खान आणि एक्सेल एन्टरटेन्मेंटवर गुन्हा दाखल करावा, असे सुचवले आहे. गत १७ एप्रिलला त्यांनी यासंबंधीचा अहवाल न्याय दंडाधिकाºयांपुढे सादर केला. या अहवालात शाहरूख खान आणि एक्सेल एन्टटेन्मेंटवर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी कलम ३०४ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असे म्हटले आहे. शाहरूख खानमुळे या ठिकाणी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी शाहरूखने चाहत्यांच्या दिशेने टी-शर्टस आणि चेंडू फेकले. ही कृती सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारी होती. शाहरूख खानने गर्दीच्या दिशेने टी-शर्ट, चेंडू आणि इतर वस्तू फेकल्या नसत्या तर चेंगराचेंगरीचा प्रसंग घडलाच नसता. त्यामुळे शाहरूख आणि एक्सेल एन्टरटेन्मेंटवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे अहवालात म्हटले आहे. एकंदर काय, तर हे प्रकरण शाहरूखच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.