हीच ती...! पहिल्याच भेटीत मंदिरावर भाळले होते राज कौशल, अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 11:50 AM2021-06-30T11:50:47+5:302021-06-30T11:52:05+5:30

Mandira Bedi and Raj Kaushal love story : मंदिरा व राज यांनी 1999 साली लग्नगाठ बांधली होती. दोघांनी लव्हस्टोरी जगावेगळी होती. दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती 1996 साली.

Raj Kaushal Passed Away Mandira bedi and raj love story | हीच ती...! पहिल्याच भेटीत मंदिरावर भाळले होते राज कौशल, अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी

हीच ती...! पहिल्याच भेटीत मंदिरावर भाळले होते राज कौशल, अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी

googlenewsNext
ठळक मुद्दे2003 च्या वर्ल्ड कपदरम्यान मंदिरा व क्रिकेटर युवराज सिंग यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. पण याचा मंदिरा व राज यांच्या नात्यावर जराही परिणाम झाला नाही.

फिटनेस स्टार व बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मंदिरा बेदीच्या (Mandira Bedi) पतीचं निधन झाल्याची बातमी आली आणि बॉलिवूडवर शोककळा पसरली. आज पहाटे मंदिराचा पती राज कौशल (Raj Kaushal) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  (Mandira Bedi Husband Raj Kaushal Passed Away)
मंदिरा व राज यांनी 1999 साली लग्नगाठ बांधली होती. दोघांनी लव्हस्टोरी जगावेगळी होती. तर दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती 1996 साली. राज कौशल हे तेव्हा मुकूल आनंद यांच्याकडे चीफ अस्टिस्टंट म्हणून काम करत होते. मुकूल आनंद ‘फिलिप्स 10’ या  टीव्ही शोसाठी ऑडिशन घेत होते. त्यावेळी मंदिरा बेदी इंडस्ट्रीतील एक मोठे नाव होते. तिची ‘शांती’ ही मालिका लोकप्रिय झाली होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या सिनेमातही मंदिरा झळकली होती. त्यामुळे राज तिला ओळखून होते. हीच मंदिरा मुकूल आनंद यांच्याकडे ऑडिशन द्यायला पोहोचली आणि यादरम्यान तिची व राज कौशल यांची नजरानजर झाली होती. लाल-पांढरा रेषांची टी-शर्ट आणि खाकी कलरची पँट घालून मंदिरा ऑडिशनला पोहोचली होती.

याचदरम्यान राज व मंदिरा यांची नजरानजर झाली होती. एका मुलाखतीत राज यावर बोलले होते. ‘एका काऊंटडाऊन शोसाठी मंदिरा ऑडिशन द्यायला मुकूल आनंद यांच्याकडे आली होती. तेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले होते. तिचा तो चेहरा मला आजही आठवतो. त्याआधी ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ या सिनेमात मी तिला पाहिले होते. पण तेव्हा तिच्याकडे फार लक्ष दिले नव्हते. ऑडिशनच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि मग भेटी होत गेल्या.... आम्ही दोघेही एकमेकांपेक्षा एकदम विरूद्ध होतो. पण पहिल्या तीन भेटीनंतरच मी मंदिराच्या  प्रेमात बुडालो होतो. मला खरं प्रेम मिळालं, याची प्रकर्षाने जाणीव झाली होती,’ असे राज म्हणाले होते.
ऑडिशनदरम्यान नजरानजर झाली आणि भेटीगाठी वाढल्या. इतक्या की, 1996 अखेरपर्यंत दोघेही सीरिअस रिलेशनशिपपर्यंत आलेत. पुढे दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला.

म्हणून राज यांच्यावर भाळली होती मंदिरा...
राज एक प्रामाणिक व सच्चा माणूस आहे. तो कधीही लपवाछपवी करत नाही. त्याच्या चेह-यावर कधीच मुखवटा नसतो, असे मंदिरा एका मुलाखतीत म्हणली होती. त्याच्या याच स्वभावावर मंदिरा भाळली होती.

घरच्यांचा होता विरोध...
राज व मंदिराच्या लग्नासाठी राज यांचे कुटुंब अगदी तयार होते. पण मंदिराच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. एका दिग्दर्शकाला आपली लेक देण्यास मंदिराचे आईबाबा तयार नव्हते. मंदिराचे वडील पूर्णपणे कार्पोरेट स्वभावाचे व्यक्ती होते. काही दिवस या लग्नाला त्यांनी जोरदार विरोध केला. पण मंदिरा मानायला तयार नव्हती. अखेर तिच्या हट्टापायी कुटुंबाने लग्नाला होकार दिला व 14 फेबु्रवारी 1999 रोजी राज व मंदिरा यांचे लग्न झाले.

लग्नाच्या 12 वर्षांनंतर बनली आई
लग्नानंतर मुलं जन्माला घालायला मंदिरा तयार नव्हती. आई झाल्यानंतर आपलं करिअर संपेल, अशी भीती तिला वाटत होती. राज यांनी तिच्या या निर्णयाचा आदर केला. वयाच्या 39 व्या वर्षी मंदिरा आई झाली. लग्नानंतर 12 वर्षांनी म्हणजे 2011 साली मंदिराने मुलाला जन्म दिला.  गेल्यावर्षी मंदिरा व राज यांनी एका 4 वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले होते.

मंदिरावर होता स्वत:पेक्षाही अधिक विश्वास...
2003 च्या वर्ल्ड कपदरम्यान मंदिरा व क्रिकेटर युवराज सिंग यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. पण याचा मंदिरा व राज यांच्या नात्यावर जराही परिणाम झाला नाही. या चर्चांवर राज यांनी एका पत्रकारांला शानदार उत्तर दिले होते. ‘माझा लग्नावर विश्वास आहे आणि मंदिरावर तर माझ्यापेक्षाही जास्त विश्वास आहे. मंदिरा ज्या क्षेत्रात काम करते, तिथे याच विश्वासाची गरज आहे,’असे म्हणत राज यांनी त्या पत्रकाराची बोलती बंद केली होती. 

Web Title: Raj Kaushal Passed Away Mandira bedi and raj love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.