Join us

राज कुंद्रा ह्या कारणामुळे बनला अभिनेता, गीतकार व रॅपर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 1:04 PM

राज कुंद्रा नुकताच अभिनेता, गीतकार व रॅपर बनला आहे. या गाण्याचे नाव आहे 'वेक अप'. या गाण्याचे चित्रीकरण नुकतेच धारावी येथील मुलांसोबत पार पडले आहे. 

ठळक मुद्देराज कुंद्राच्या लेखणीतून साकार झाले 'वेक अप' गाणेराज कुंद्रा व शिल्पा शेट्टी करतात समाजकार्यअनाथालयमध्ये राहणाऱ्या मुलांची परिस्थिती दर्शविणारा 'वेक अप' व्हिडिओ

बिझनेसमॅन व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा नुकताच अभिनेता, गीतकार व रॅपर बनला आहे. या गाण्याचे नाव आहे 'वेक अप'. या गाण्याचे चित्रीकरण नुकतेच धारावी येथील मुलांसोबत पार पडले आहे. 'वेक अप' हे गाणे पलाश मुच्छलने संगीतबद्ध केले असून राज कुंद्रा याने या गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि या गाण्याला राज आणि पलाश यांनी स्वरसाज दिला आहे. राज आणि शिल्पा शेट्टी बऱ्याच वर्षांपासून अनाथ मुलांसाठी काम करतात. वेक अप या गाण्यातून या मुलांची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न राज कुंद्रा यांनी केला आहे.याबाबत राज कुंद्रा याने सांगितले की, 'शिल्पा आणि मी अनाथ मुलांसाठी काम करतो आणि त्यांच्यासाठी निधी देतो. या मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था त्यांच्यासाठी जास्त पैसे गोळा करू शकत नाही. मात्र त्यांना संस्था कशी चालवायची हे बरोबर माहित आहे. त्यामुळे आम्ही अनाथालय दत्तक घ्यायचे ठरविले. तिथल्या पन्नास मुलांना एड्स असल्याचे आढळून आले. त्यांचा संपूर्ण खर्च आम्ही करतो. '

वेक अप या व्हिडिओ अल्बमबद्दल सांगताना राज म्हणाले की 'मी पलाशला सांगितले की मी हे गाणे गाणार नाही. माझा आवाज तितका चांगला नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी मुलांसोबत संवाद साधताना दिसणार आहे.'अनाथालयमध्ये राहणाऱ्या मुलांची परिस्थिती दर्शवणारा 'वेक अप' हा व्हि़डिओ अल्बम समाजाला सामाजिक कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल का हे पाहणे कमालीचे ठरेल.  

टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टी