‘त्या’ व्हिडीओमध्ये 2-3 मिनिटांची न्युडिटी, पण..., तनवीर हाश्मीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 10:34 AM2021-07-26T10:34:00+5:302021-07-26T10:34:53+5:30
Raj Kundra Pornography case : राज कुंद्राला अटक झाल्यानंतर रोज नवे खुलासे होत आहेत. आता पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणातील आरोपी तनवीर हाश्मी यानं नवा खुलासा केला आहे.
पोर्नोग्राफीप्रकरणी राज कुंद्राला (Raj Kundra Pornography case) अटक झाल्यानंतर रोज नवे खुलासे होत आहेत. काही जण त्याच्या बाजूनं तर काही जण त्याच्या विरोधात बोलत आहेत. आता पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणातील आरोपी तनवीर हाश्मी (Tanveer Hashmi) यानं नवा खुलासा केला आहे. तो बनवत असलेल्या व्हिडीओंना पॉर्न म्हटलं जाऊ शकत नाही, असं त्यानं म्हटलं आहे.
रविवारी मुंबई क्राईम ब्रान्चनं तनवीरला चौकशीसाठी बोलवलं होतं. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना तनवीरनं सांगितलं की, मला क्राईम ब्रान्चनं चौकशीसाठी बोलावलं होतं. मी त्यांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. मला राज कुंद्राबद्दल विचारलं गेलं. मी राज कुंद्राला कधीही भेटलेलो नसल्याचं मी सांगितलं. मी फक्त त्याच्या कंपनीला व्हिडीओ बनवून द्यायचो. या व्हिडीओंना पॉर्न म्हणता येणार नाही, असं मी सांगितलं. मला आधी अटक केली होती. पण मी काहीही चुकीचं केलेलं नाही आणि म्हणूनच जामीनावर बाहेर आहे. माझ्यावर जे आरोप आहेत, त्यावर मी काहीही बोलणार नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Businessman Raj Kundra has been brought to Crime Branch's property cell office in Byculla, Mumbai, late last night.
— ANI (@ANI) July 23, 2021
He & Ryan Thorpe have been sent to police custody till July 27 in connection with a pornography case. pic.twitter.com/v01LBk2zxz
माफीचा साक्षीदार बनणार का? असं मीडियानं विचारलं असता, मी का साक्षीदार बनू? मला यात काहीही गुन्हा घडलेला दिसत नाहीये. गुन्हाचं नाही तर साक्षीदार बनण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी जो कंटेंट बनवत होतो तो पॉर्न नव्हता. शिवाय राज कुंद्राच्या कंपनीशी माझा थेट असा काहीही संंबंध नाही. मी 20-25 मिनिटांच्या शॉर्ट फिल्म्स बनवायचो. यात 2-3 मिनिटांची न्युडिटी असायची. पण त्याला पॉर्न म्हणता येणार नाही, असं तो म्हणाला.
Maharashtra | A team of Mumbai Police Crime Branch leaves from the residence of actor Shilpa Shetty after recording her statement in a case related to pornography film production in which her husband Raj Kundra was arrested. pic.twitter.com/FcSg8L8oou
— ANI (@ANI) July 23, 2021
पोलिसांना विचारलं पाहिजे...
केस का केली, हे पोलिसांना विचारलं पाहिजे. खूप लोक ओटीटीवर कंटेंट बनवत आहेत. जोपर्यंत याबाबतीत कायदा बनत नाही, तोपर्यंत याला चूक कसं ठरवता येईल? मी निकाल देत नाहीये. हे सर्व कायदा ठरवणार. मी माझी लढाई कोर्टात लढेल, असंही तनवीर हाश्मी म्हणाला.