गेल्या वर्षी पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेले उद्योगपती राज कुंद्रा(Raj Kundra)ने पत्नी शिल्पा शेट्टी कुंद्राच्या नावावर त्याचे फ्लॅट आणि जुहूचे घर केलं आहे. ETimesच्या 'zapkey.com' च्या रिपोर्ट्सनुसार राज कुंद्राची ही मालमत्ता (Raj Kundra transfers Juhu house to Shilpa)38.5 कोटींची आहे, जी त्याने आता शिल्पाच्या नावावर केली आहे. राज कुंद्राने एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या पाच फ्लॅट्स आणि जुहूचा बंगला शिल्पाच्या नावावर केल्याचं सांगण्यात येत आहे. हा बंगला 5,995 स्क्वेअर फूटचा आहे, जो ट्रान्सफर केल्यावर शिल्पाने 1.9 कोटींची स्टॉप ड्युटी भरली आहे. रिपोर्टनुसार, डॉक्युमेंट्सचं रजिस्ट्रेशन 21 जानेवारी 2022 रोजी झाले.
पॉर्नोग्राफी केसमध्ये 2 महिने होतो जेलमध्ये बंद राज कुंद्राला 2021 मध्ये पॉर्न फिल्म बनवल्याबद्दल आणि विविध अॅप्सवर प्रसारित केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. राज कुंद्रा सुमारे 2 महिने तुरुंगात होता आणि त्यानंतर त्याला सप्टेंबर 2021 मध्ये 50,000 रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्राने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून स्वतःला दूर केले आणि मीडियापासूनही दूर राहू लागले. नुकताच तो शमिता शेट्टीच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसला होता.
राज कुंद्राचे वडील आणि संपूर्ण कुटुंब पंजाबमध्ये राहत होते. पण नंतर राजचे वडील लंडनला गेले आणि बस कंडक्टर झाले. राज कुंद्राचा जन्म लंडनमध्येच झाला होता. वयाच्या १८ व्या वर्षी त्याने पश्मिना शॉलचा व्यवसाय सुरू केला. राज कुंद्राने नेपाळमधून पश्मिना शॉल्स आणल्या आणि ब्रिटनमधील मोठ्या फॅशन हाउसला विकल्या. त्यानंतर त्याने दुबईमध्ये हिऱ्यांचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. राज कुंद्राने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले आहेत.