बॉलिवूडच्या फॅन्सला जवळजवळ सर्वच स्टारकिड्सबद्दल माहिती आहे. पण एका स्टारकिडवर कदाचित तुमचं लक्ष गेलं नसावं. होय, आम्ही बोलतोय ते सुपरस्टार राजेश खन्ना ( Rajesh Khanna) व डिंपल कपाडिया ( Dimple Kapadia )यांच्या नातीबद्दल. तिचं नाव, नाओमिका सरन (Naomika Saran). सध्या तिचीच चर्चा आहे. इंटरेनटवर तिचं नाव सर्च होत आहे.
राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांची थोरली लेक रिंकी खन्ना हिच्याबद्दल तुम्हाला ठाऊक असेलच. रिंकीने ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात तिच्यासोबत डिनो मोरिया आणि संजय सूरी लीड रोलमध्ये होते. यानंतर मुझे कुछ कहना है, जिस देश में गंगा रहता है, झंकार बीट्स अशा सिनेमात दिसली. पण तिची जादू काही चालली नाही. अॅक्टिंगमध्ये आपलं फार काही खरं नाही, हे लक्षात आल्यावर रिंकीने लग्न करून संसार थाटण्याचा निर्णय घेतला. 2003 साली बिझनेसमॅन समीर सरनसोबत तिने लग्न केलं आणि विदेशात सेटल झाली. नाओमिका ही रिंकी व समीर सरन यांची लेक आहे.
सध्या याच नाओमिकाची चर्चा आहे. अलीकडे ट्विंकल खन्नाने रिंकी खन्नाच्या बर्थ डेला नाओमिकासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. नाओमिका प्रचंड ग्लॅमरस आहे. आपल्या स्टाईलमुळे ती सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. तिची स्टाईल, तिची ब्युटी पाहून अनेक चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
नाओमिका सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह नाही. पण तिला चित्रपटांमध्ये इंटरेस्ट असल्याचं म्हटलं जात आहे. ट्विंकलच्या पोस्टनंतर अनेकजण तिला इंटरनेटवर सर्च करत आहेत. सध्या नाओमिका लंडनमध्ये शिकते आहे. येणाऱ्या काळात ती फिल्मी दुनियेत येते की नाही, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.