रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या चित्रपटाने रिलीजपूर्वीचं इतिहास रचला. होय, सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. यातील व्हिएफएक्स इफेक्टवर थोडे थोडके नाही तर ५४४ कोटी रूपये खर्च केले गेले आहेत. विशेष म्हणजे, ही माहिती खुद्द अक्षय कुमारने आपल्या सोशल अकाऊंटवर दिली आहे. चित्रपटाच्या व्हिएफएक्सवर ५४४ कोटी रूपये खर्च झालेत. चित्रपट बनवण्यासाठी ३ हजारांवर टेक्निशियनची मदत घेतली गेली, अशी माहिती अक्षयने चाहत्यांशी शेअर केली आहे. निश्चितपणे भारतीय चित्रपटांच्या इतिहासात हा एक व्रिकम आहे. आजपर्यंत कुठल्याही चित्रपटाच्या व्हिएफएक्सवर इतका खर्च केला गेलेला नाही. त्यामुळे ‘2.0’ या चित्रपटाला भारतातील सर्वात महागडा चित्रपट म्हणणे गैर होणार नाही़ हा संपूर्ण चित्रपट ३-डीमध्ये शूट केला गेला. हेही भारतात पहिल्यांदाच झाले आहे.येत्या १३ सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीजर रिलीज होणार आहे. यानंतर याचवर्षी २९ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तामिळ आणि हिंदीमध्ये हा चित्रपट रिलीज होईल़ यानंतर १३ अन्य भाषांत तो डब केला जाईल.या चित्रपटाची रिलीज डेट आजपर्यंत अनेकदा पुढे ढकण्यात आली. व्हिएफएक्समुळेच चित्रपटाचे प्रदर्शन लांबल्याची बातमी मध्यंतरी आली होती. या कारणामुळे चित्रपट यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल, असेही सांगितले गेले होते. पण ओव्हरनाईट आणि डबल शिफ्टमध्ये काम करून हे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे याचवर्षी या चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याचवर्षी ७ जूनला रजनीकांत यांचा ‘काला’ रिलीज झाला होता. यानंतर उण्यापु-या सहा महिन्यांत रजनीकांत यांचा ‘2.0’ हा दुसरा चित्रपट रिलीज होणार आहे. म्हणजे एकाच वर्षात रजनीकांत यांचे दोन लाईव्ह अॅक्शन चित्रपट रिलीज होतील. हा योग तब्बल २३ वर्षांनंतर जुळून आला आहे. यापूर्वी १९९५ साली रजनीकांत यांचे ‘भाषा’ आणि ‘मुथु’ असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यानंतर यंदा त्यांचे एकापाठोपाठ एक असे दोन चित्रपट पे्रक्षकांना पाहता येणार आहेत. साहजिकच रजनींच्या चाहत्यांसाठी ही डबल ट्रिट असणार आहे.
रजनीकांत- अक्षय कुमारच्या ‘2.0’च्या व्हीएफएक्सवर खर्च झालेत ५४४ कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 4:16 PM