Join us

रजनीकांत : बस कंडक्टर ते ‘अभि’नेता!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 4:05 PM

२०१७ च्या अखेरच्या दिवशी सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय प्रवासाची घोषणा करून अनेक प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांमध्ये धडकी भरविली. त्यांचा ...

२०१७ च्या अखेरच्या दिवशी सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय प्रवासाची घोषणा करून अनेक प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांमध्ये धडकी भरविली. त्यांचा राजकीय प्रवास तामिळनाडूमध्ये दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर सुरू झाली आहे. त्यामुळे लोकांना असे वाटत आहे की, कदाचित ‘थलैवा’च ‘अम्मा’ची जागा भरून काढेल. त्यांची उपस्थिती, त्यांचा आवाज, त्यांचा विश्वास याउपरही त्यांचा एक फोटो चाहत्यांची तुफान गर्दी करण्यास पुरेसा आहे. कारण जेव्हा-जेव्हा रजनी यांचा चित्रपट रिलीज होतो तेव्हा-तेव्हा चाहते एखाद्या उत्सवाप्रमाणे त्याचे सेलिब्रेशन करतात. त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला जातो. त्यांची आरती केली जाते. त्यांच्या चित्रपटाला एवढी गर्दी असते की, चित्रपटाच्या रिलिजच्या दिवशीच हॉलीडे डिक्लेयर केला जाते. काही लोक त्यांना सुपरस्टार म्हणतात, तर काही ‘स्वयं भगवान’ असे संबोधतात. वास्तविक सोप्या अन् सरळ शब्दात ते केवळ रजनीकांत आहेत. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यांची इमेज जरी एखाद्या ‘भगवान’ किंवा सुपरमॅनसारखी असली तरी त्यांची वास्तविक जीवनातील कथा या परिकथेच्या अगदीच विपरीत आहे. रजनीकांत यांचा १२ डिसेंबर १९५० रोजी एका मराठी परिवारात जन्म झाला. चार भाऊ-बहिणींमध्ये रजनीकांत सर्वांत लहान आहेत. ते लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती खूप गंभीर होती. त्यामुळे लहानपणीच त्यांनी छोटे-मोठे कामं करण्यास सुरुवात केली. कारपेंटरपासून ते कुली बनण्यापर्यंत त्यांनी कामे केली. मात्र अशातही त्यांचा लहानपणापासूनच चित्रपटांप्रती लगाव होता. ते शाळेत असताना नेहमीच नाटकांमध्ये सहभाग घ्यायचे. येथेच त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रजनीकांतने बंगळुरू येथील एका ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यावेळी ते कन्नड रंगमंचावरही काम करू लागले. पुढे १९७३ मध्ये ते मद्रास फिल्ड इन्स्टिट्यूटशी जोडले गेले. याचदरम्यान ते इंडियन फिल्म दिग्दर्शक के. बालचंद्र यांच्या संपर्कात आले. त्यावेळी ते रजनीकांत यांना बघून खूपच प्रभावित झाले होते. १९७५ मध्ये रजनीकांत आणि के. बालचंद्र यांची पहिली भेट झाली. तेव्हा बालचंद्र यांनी रजनी यांना एक छोटी भूमिका आॅफर केली. मात्र खरे यश त्यांना ‘भैरवी’ या चित्रपटातून मिळाले. कारण या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली. पुढे रजनीकांत यांनी आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवत, संघर्ष सुरू ठेवला. अखेर तो दिवस आला जेव्हा के. बालचंद्र यांनी म्हटले की, ‘तो मला त्याचे विद्यालय समजतो, परंतु मला हे सांगावेसे वाटेल की रजनीकांतला मी नाही घडविले, त्यानेच काळानुरूप स्वत:ला घडविले. मी त्याला जगासमोर सादर केले अन् त्याने जग जिंकले.’१९७५ नंतर रजनीकांत यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यामध्ये ‘थलापती (१९९१), बाशा (१९९५) आणि पदायाप्पा (१९९९) हे त्यांचे त्याकाळातील सर्वाधिक यशस्वी चित्रपट आहेत. या चित्रपटांनंतर ते केवळ अभिनेता राहिले नाहीत, तर लोकांसाठी आयकॉन बनले. त्यांचे चित्रपट आणि डायलॉग्स लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच एन्जॉय करू लागले. पुढे २००० मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी २००७ मध्ये ‘शिवाजी’ आणि २०१० मध्ये ‘रोबोट’ या चित्रपटांमध्ये काम केले. हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. आता त्यांचा ‘२.०’ हा चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. हा चित्रपट इंडियन सिनेमामधील सर्वाधिक महागडा असल्याने संपूर्ण जगाचे याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, आता रजनीकांत राजकारणात उतरणार असून, याठिकाणी त्यांचा प्रभाव दिसून येईल यात काहीही शंका नाही.