Join us

​रजनीकांत कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 12:04 PM

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्याबाबत अलीकडे विविध अफवा उठत आहेत. रजनीकांत कोणत्या पक्षात जाणार हा प्रश्न असतानाच, आपण कोणत्याही पक्षाचे ...

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्याबाबत अलीकडे विविध अफवा उठत आहेत. रजनीकांत कोणत्या पक्षात जाणार हा प्रश्न असतानाच, आपण कोणत्याही पक्षाचे समर्थन करणार नसल्याचे ट्विट रजनीकांत यांनी केले आहे.तामिळनाडूमध्ये रजनीकांत यांचा फॅन फॉलोअर मोठ्या प्रमाणावर आहे. रजनीकांतने कोणत्याही पक्षाला समर्थन दिले तर त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार हे निश्चित. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनामुळे आर. के. नगर या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे ट्विट रजनीकांत यांनी केले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून संगीतकार गंगई आमरान हे उमेदवार आहेत. रजनीकांत यांच्याशी पंतप्रधान मोदी यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते भाजपाला पाठिंबा देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशावेळी त्यांनी ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रजनीकांत हे २.० या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटात अक्षय कुमारही असणार आहे.