रजनीकांत यांचे ‘हे’ वक्तव्य कोणालाही सुपरस्टार बनवेल, वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 8:54 AM
शंकर यांचा बहुप्रतिक्षित २.० चे पोस्टर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाबद्दल विविध प्रकारच्या चर्चा रंगत आहेत. चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत ‘चिट्टी’चीच भूमिका ...
शंकर यांचा बहुप्रतिक्षित २.० चे पोस्टर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाबद्दल विविध प्रकारच्या चर्चा रंगत आहेत. चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत ‘चिट्टी’चीच भूमिका साकारणार असून, खलनायकाच्या भूमिकेत बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार झळकणार आहे. त्याव्यतिरिक्त अभिनेत्री एमी जॅक्सन हिचीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शंकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एक सायन्स फिक्शन असून, त्यास ए. आर. रहमान यांनी संगीत दिले आहे. दरम्यान, सुपरस्टार रजनीकांत यांनी याच चित्रपटाच्या अनुषंगाने एक वक्तव्य केले असून, ते वाचून स्ट्रगल करणाºया कलाकारांना नवी प्रेरणा देईल, यात शंका नाही. होय, रजनीकांत यांना या चित्रपटाच्या अनुषंगाने विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केले. नुकताच या चित्रपटाचा आॅडिओ दुबईत रिलीज करण्यात आला. यासाठी अभिनेता अक्षयकुमार दुबईत पोहोचला होता. असो, रजनीकांतबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांच्यातील दिलदारपणा आणि साथेपणा सगळ्यांनाच भावणारा आहे. त्यामुळेच त्यांना इंडस्ट्रीत ‘थलाइवा’ आणि ‘बॉस’ असे म्हटले जाते. एका मुलाखतीत जेव्हा त्यांना, ‘तुम्ही एवढे डाऊन टू अर्थ कसे राहता?’ असे विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, ‘वास्तविक माझी अभिनय करण्याची इच्छा नव्हती. कारण मला त्याकरिता पैसे मिळत नव्हते. मी जसा आहे, तसाच राहू इच्छित होतो.’ रजनीकांत यांचे हे विचार खरोखरच विचार करण्यास भाग पाडणारे आहेत. त्याचबरोबर ते त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात का आहेत? या प्रश्नाचे उत्तरही मिळते. तसेच रजनीकांत हे किती डाऊन टू अर्थ आहेत याचाही प्रत्यय येतो. असो, रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित ‘२.०’ हा चित्रपट पुढच्या वर्षी २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटात अक्षयने पहिल्यांदाच अशाप्रकारची भूमिका साकारल्याने तोदेखील चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या या भूमिकेविषयी अक्षयने दावा केला की, प्रेक्षक त्याला या अवतारात बघून दंग राहतील. अक्षयने म्हटले की, ‘पहिल्यांदाच मी अशाप्रकारची भूमिका करीत आहे. अॅण्टी हीरो म्हणून भूमिका साकारणे हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. सध्या मी त्याचा पूर्ण आनंद घेत आहे. दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर यांचा ‘२.०’ हा चित्रपट ‘रोबोट’च्या तुलनेत पूर्णपणे वेगळा आहे. त्याचबरोबर यासाठी आम्ही कुठल्याही हॉलिवूडपटाची कॉपी केली नसल्याने प्रेक्षकांच्या हृदयात हा चित्रपट स्थान मिळवेल यात शंका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या चित्रपटाची सध्या प्रेक्षकांना प्रचंड आतुरता लागली आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा ट्रेलर काय धमाका करेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.