Join us

काळा चष्मा, काळा कोट... रजनीकांतचा 'थलाइवर 170' मधील लक्षवेधी लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 20:25 IST

रजनीकांत यांच्या आगामी ''थलाइवर 170' सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांना कोणत्याच विशेष ओळखीची गरज नाही. त्यांचे चित्रपट लार्जर दॅन लाइफ असतात.  रजनीकांत यांच्या नवीन सिनेमाची त्यांचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत होते. 'जेलर'च्या जबरदस्त यशानंतर आता 'थलाइवर 170' या सिनेमात रजनीकांत पाहायला मिळणार आहे. रजनीकांत यांच्या आगामी ''थलाइवर 170' सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटातील  रजनीकांतचा दमदार लूक समोर आला आहे. 

'थलाइवर 170' चित्रपटाचे शुटिंग सुरू झाले आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर रजनीकांतचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये सुपरस्टार विंटेज लूकमध्ये दिसत आहे. रजनीकांतच्या आगळ्या-वेगळ्या लूकमुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. 

 बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत 'थलाइवर 170' या सिनेमाच्या माध्यमातून 32 वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. अमिताभ बच्चन आणि रजनीकांतची जोडी 1991 मध्ये आलेल्या 'हम' या सिनेमात एकत्र झळकली होती. त्यानंतर दोघांनाही एकत्र काम केलं नव्हत. 

शिवाय, या चित्रपटात मंजू वारियर, फहद फासिल, राणा दग्गुबती, रितिका सिंग आणि दुशारा विजयन यांच्याही भूमिका आहेत. अनिरुद्ध रविचंदन यांनी या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. टीजे गनानवेल या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. 2024 मध्ये हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सुपरस्टार रजनीकांत यांचे देशातच नाही तर विदेशातही मोठे चाहते आहेत. ते कायमच थलैवाच्या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक असतात. रजनीकांत सध्या त्यांच्या 'जेलर' चित्रपटामुळे चर्चेत आहेत.  रजनीकांत याआधी २०२१ मध्ये 'दरबार' आणि 'अन्नात्थे' या सिनेमात दिसले होते.  

टॅग्स :रजनीकांतTollywoodसेलिब्रिटी