दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष सध्या दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. २०२० साली तो जगामे थंदिरम आणि कर्णन या चित्रपटात दिसणार आहे. २८ जुलै, १९८३ साली तमीळनाडूमधील थेनी येथे जन्मलेला धनुष ७२ कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे.
धनुषने कधीच अभिनेता बनण्याचा विचार केला नव्हता. त्याला शेफ बनायचे होते. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, शेफ बनण्यासाठी त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्याचा विचार केला होता. मात्र त्याच्या भावाने त्याला अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी सांगितले. भावाचे ऐकून त्याने सिनेइंडस्ट्रीत नशीब आजमावण्याचे ठरवले.
धनुषचं खरं नाव वेंकेटेश प्रभू कस्तूरी राज आहे. धनुष या नावामागे देखील एक स्टोरी आहे. वयाच्या १६ व्या वर्षी त्याने चित्रपटातून कारकीर्दीला सुरूवात केली होती.या दरम्यान त्याने नाव बदलण्याचा विचार केला. १९९५ साली प्रदर्शित झालेला चित्रपट कुरूद्दीपुन्नलमध्ये धनुष नामक मिशन होते. यामुळेच प्रभावित होऊन वेंकेटेश प्रभूने स्वतःचं नाव धनुष ठेवले.
रजनीकांत यांच्या मोठ्या मुलीसोबत धनुषने लग्न केले. धनुषपेक्षा रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या दोन वर्ष मोठी आहे. ते दोघे पहिल्यांदा २००३ साली कढाल कोंडीयन या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भेटले होते. २००४ साली दोघे विवाहबंधनात अडकले. धनुष भगवान शिव यांचा भक्त असून त्याने त्याच्या दोन्ही मुलांची नावे यत्र व लिंगा ठेवले आहे.
धनुषला कारचे वेड असून त्याच्याकडे ऑडी ए८, बेनेटली कॉन्टिनेंटल फ्लाइंग स्पर, जग्वॉर एक्सई, रोल्स रॉईस घोस्ट सीरिज २ असे लक्झरी कार त्याच्याकडे आहेत.
धनुषकडे पम्मल, चेन्नईमध्ये आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास १८ कोटी रुपये इतकी आहे. हे घर त्याने २०१३ साली विकत घेतले आहे. त्याच्याकडे एक गेस्ट हाऊस देखील आहे. धनुष एका चित्रपटासाठी ७ ते १० कोटी रुपये मानधन घेतो.