Join us

राजकुमारला खेळाडूच्या बायोपिकमध्ये करायचे आहे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 08:00 IST

अभिनेता राजकुमार रावलाही बायोपिक करायचा असून त्याला एखाद्या खेळाडूच्या जीवनपटावर काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. 

ठळक मुद्देराजकुमारने शालेय जीवनात तायक्वांदोमध्ये केलीत अनेक पदके संपादित

बॉलिवू़डमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड आला असून दिग्गज व्यक्तींवर चित्रपट बनत आहेत. आगामी काळात बरेच बायोपिकचा अास्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता राजकुमार रावलाही बायोपिक करायचा असून त्याला एखाद्या खेळाडूच्या जीवनपटावर काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. 

राजकुमारने शालेय जीवनामध्ये तायक्वांदो या खेळामध्ये अनेक पदके संपादित केली आहेत. त्याप्रमाणे त्याने राष्ट्रीय स्तरावरही हा खेळ खेळला आहे. त्यामुळे त्याचे अभिनयाएवढेच खेळावरही प्रेम आहे. ‘क्रीडा या प्रकाराशी माझे लहानपणापासून नाते जोडले गेलेले आहे. उत्तर भारतात बहुतांश मुले क्रिकेटचे वेडे आहेत. सहाजिकच आहे त्यामुळे माझ्या रक्तातही क्रिकेट धावते. जेथे जागा मिळेल तेथे आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करतो. त्यामुळे क्रिकेटवर माझे निस्सिम प्रेम आहे. त्याबरोबरच मी दहा वर्ष तायक्वांदो हा खेळही खेळलो आहे. त्यामुळे मला हे दोन्ही खेळ प्रिय आहेत’, असे तो म्हणाला.क्रिकेट, तायक्वांदोप्रमाणेच कबड्डी, हॉकी या खेळामध्येही चांगली कामगिरी करणारे खेळाडू होते आणि अजूनही आहेत. त्यामुळे अशा खेळाडूंच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटात झळकायला मला आवडेल. मला खेळाची आवड असल्यामुळे या चित्रपटांना मी पुरेपूर न्याय द्यायचा प्रयत्न करु शकतो, असे राजकुमारने सांगितले.राजकुमार सध्या ‘फन्ने खा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर ऐश्वर्या राय -बच्चन, अनिल कपूर, सतिश कौशिक हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या ३ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी काळात राजकुमारला एखाद्या खेळाडूचा बायोपिक करताना रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :राजकुमार राव