Join us

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे नामांकन मिळताच सोशल मीडिया ट्रोल झालेत राजकुमार हिरानी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 10:19 AM

फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनात हिरानींना ‘संजू’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून नामांकन मिळाले. पण त्यांच्या नामांकनाची घोषणा होताच ‘मीटू’चे भूत पुन्हा त्यांच्या मानगुटीवर बसले.

ठळक मुद्दे‘मीटू’अंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचा आरोप झालेली व्यक्ति फिल्मफेअरच्या नामांकन यादीत कशी? असा प्रश्न सोशल मीडिया युजर्सनी उपस्थित केला.

गतवर्षी राजकुमार हिरानी यांचा ‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स आॅफिसवर सुपरडुपर हिट ठरला. पण या चित्रपटानंतर लगेच हिरानी ‘मीटू’च्या वावटळीत अडकले. या चित्रपटाच्याच एका क्रू मेंबरने राजकुमार हिराणी यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप ठेवला. या आरोपानंतर ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या यादीतून हिरानींचे नाव गाळण्यात आले. हिरानींवरील आरोपांचे प्रकरण बरेच गाजले. काही त्यांच्या बाजूने उतरले तर काहींनी त्या प्रकरणात ‘फेअर ट्रायल’ची मागणी केली. अर्थात हळूहळू प्रकरण निवळले आणि हिरानी सार्वजनिक समारंभात दिसू लागले. अलीकडे फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनात हिरानींना ‘संजू’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून नामांकन मिळाले. पण त्यांच्या नामांकनाची घोषणा होताच ‘मीटू’चे भूत पुन्हा त्यांच्या मानगुटीवर बसले.

होय, सोशल मीडियावर लोकांनी हिरानींना ट्रोल करणे सुरु केले. ‘मीटू’अंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचा आरोप झालेली व्यक्ति फिल्मफेअरच्या नामांकन यादीत कशी? असा प्रश्न सोशल मीडिया युजर्सनी उपस्थित केला. अनेकांनी यावरून फिल्मफेअरला लक्ष्य केले.

काय आहेत आरोप

राजकुमार हिरानी यांनी ९ एप्रिल २०१८ ला अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी आणि कार्यालयात माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्याकडे गप्प राहण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. जेव्हापर्यंत मी शांत राहू शकत होते, तोपर्यंत गप्प बसले. कारण त्यावेळी मला नोकरी टिकवायची होती. मी त्यावेळी काही बोलले असते, तर माझे काम वाईट आहे, असे हिरानी यांनी सर्वांना सांगितले असते. त्यामुळे माझे भविष्य उद्ध्वस्त झाले असते, अशी व्यथा पीडितेने मेलमधून मांडली होती. दरम्यान हे सगळे आरोप खोटे असून मला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे, असे राजकुमार हिरानी म्हणाले होते.

टॅग्स :राजकुमार हिरानीफिल्मफेअर अवॉर्ड