Join us  

भोजपुरी अभिनेता पवन सिंहबरोबर राजकुमार थिरकणार, 'विक्की विद्या का...' सिनेमातील 'तो' व्हिडिओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 9:00 AM

राजकुमार रावच्या 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमातील एका गाण्याची चर्चा रंगली आहे. 

'स्त्री २' नंतर राजकुमार राव 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजकुमार रावबरोबर या सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता राजकुमार रावच्या 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमातील एका गाण्याची चर्चा रंगली आहे. 

'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमातील एक नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यात राजकुमार राव भोजपुरी अभिनेता पवन सिंहबरोबर थिरकताना दिसणार आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत पवन सिंहबरोबर राजकुमार रावने ठुमके लावल्याचं पाहायला मिळत आहे. 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमातील या नवीन गाण्याची झलक पाहून चाहतेही उत्सुक आहेत. लवकरच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

पवन सिंह हे भोजपुरी सिनेमातील मोठं नाव आहे. अभिनेता असण्याबरोबरच एक उत्तम गायकही आहे. याआधी राजकुमार रावच्या स्त्री २ सिनेमातील कटी रात या गाण्याला पवन सिंहने आवाज दिला होता. आता पुन्हा एकदा बॉलिवूड सिनेमात त्याची एन्ट्री झाली आहे. 

राजकुमार राव आणि तृप्ती डिमरीच्या 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमात प्रेक्षकांना रोमान्स, ड्रामा आणि कॉमेडीचा पुरेपूर डोस पाहायाला मिळणार आहे. या सिनेमातून अभिनेत्री मल्लिका शेरावत कमबॅक करत आहे. या सिनेमात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ११ ऑक्टोबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 

टॅग्स :राजकुमार रावसेलिब्रिटी