Join us

'बधाई दो' ते 'भीड' राजकुमार रावचा थक्क करणारा फिल्मी प्रवास, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 19:46 IST

Rajkumar Rao : राजकुमार रावने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे.

राजकुमार राव (Rajkumar Rao) चित्रपटसृष्टीत अनेक नावांनी ओळखला जातो ते म्हणजे अष्टपैलू अभिनेता, वैचारिक अभिनेता, नव विचारी अभिनेता, एवढं सगळं असून आपल्या कामातून नेहमीच काहीतरी बेस्ट देऊन राजकुमार राव काम करत राहतो. मानवी विचार आणि भारतीय सामाजिक जाणीव या बद्दल सखोल विचार करून तो त्याची काम सर्वोत्तम करतोय.  एक अभिनेता म्हणून त्याने अनेक भूमिका साकारल्या आहेत. 

बायसेपबद्दल प्रेम असलेला, प्रोटीन शेक चगिंग आणि बधाई दो मधल्या पोलिसांची  भूमिका साकारून सगळ्यांच मनोरंजन करणारा अभिनेता ते आता आपली जातीय ओळख लपवून आपल्या कुटुंबाचे नाव बदलून स्थानिक कामगारांचे स्थलांतरित रुप भीडमध्ये साकारणारा अभिनेता असो किंवा आपल्या कामाची एक अनोखी शैली साकारून ओ माय डार्लिंग मधली राजकुमारची भूमिका असो त्याने प्रत्येक कलाकृती उत्तम साकारली आहे. 

भीड चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर राजकुमार राव याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ज्यात त्याने आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले आहे. राजकुमारच्या अभिनयाची प्रशंसा आणि प्रेक्षकांनी या भूमिकेला प्रेम दिले. उत्कृष्ट अभिनयासाठी राजकुमार ला देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखले जाते. अनुभव सिन्हा यांच्या २०२३ मधला उत्तम चित्रपट म्हणून भीडचे कौतुक झाले आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. 

नुकतंच राजकुमार रावला मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन आणि बेस्ट अक्टर ज्युरी या दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. मिस्टर अँड मिसेस माही, गन्स अँड गुलाब्स एसआरआय आणि श्रीकांत बोला यांचा बायोपिक अश्या अनेक आगामी चित्रपटात राजकुमार राव दिसणार आहे.

टॅग्स :राजकुमार राव