Join us

Bheed: राजकुमार रावच्या 'भीड'ची पहिली झलक पाहून व्हाल भावुक, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 17:37 IST

Rajkummar Rao and Bhumi Pednekar movie Bheed : राजकुमार रावचा सिनेमा दीर्घकाळानंतर प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाचं नाव आहे 'भीड'.

 Rajkummar Rao and Bhumi Pednekar movie Bheed : राजकुमार रावचा सिनेमा दीर्घकाळानंतर प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाचं नाव आहे 'भीड'. घोषणा झाली, तेव्हापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. चित्रपटात राजकुमार रावसोबत भूमी पेडणेकर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. येत्या २४ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आता या चित्रपटाची पहिली झलक मेकर्सनी शेअर केली आहे. "आर्टिकल 15", "थप्पड" सारखे चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे अनुभव सिन्हा यांनी चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यामुळेच या चित्रपटाची पहिली झलक पाहण्यास चाहते उत्सुक होते. आता ही झलक समोर येताच चाहते क्रेझी झाले आहेत. 

'भीड'ची पहिली झलक तुम्हाला भावुक करेल. सुरूवातीला ब्लॅक ॲण्ड व्हाईट सीन्स दिसतात. यात दिसते ती गर्दी. लोक ट्रेनच्या छतावर बसून, बसच्या खिडक्यांना लटकून प्रवास करत आहेत आणि पोलिस पाण्याचा मारा करत या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करताहेत. फोटो बघता ही फाळणीची दृश्य असल्याचं वाटतं. पण नाही, हे फोटो आहेत २०२० सालचे. 

बॅकग्राऊंडला आशुतोष राणा यांचा आवाज ऐकू येतो आणि सगळं चित्र स्पष्ट होतं. 'अचानक लोगों को ये अहसास हुआ कि जहां वो रह रहे हैं, वो घर उनके नहीं हैं...ये नजारा साल 2020 का है जब एक बार हमारे समाज को फिर अंधकार ने जकड़ लिया था...,' हे आशुतोष राणांच्या तोंडचे संवाद अंगावर काटा आणतात.'भीड'चा ही झलक पाहून चित्रपट कशावर आधारित आहे, याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तर हा चित्रपट कोरोना महामारीकाळात लागलेल्या लॉकडाऊन काळावर आधारित आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांनी जे काही भोगलं ते दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. चित्रपटात राजकुमार राव, पंकज कपूर, भूमी पेडणेकर, दिया मिर्झा आणि आशुतोष राणा यांच्या अनुभवी कलाकारांच्या भूमिका आहेत.

टॅग्स :राजकुमार रावभूमी पेडणेकर बॉलिवूड