Join us

‘स्त्री’च्या बम्पर यशानंतर राजकुमार राव घेऊन येणार आणखी एक हॉरर कॉमेडी सिनेमा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 11:25 AM

‘स्त्री’च्या अपार यशानंतर या चित्रपटाचा निर्माता दिनेश विजनने आणखी एक हॉरर कॉमेडी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. होय, ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी ट्वीटरवर याची माहिती दिली आहे.

ठळक मुद्दे‘स्त्री’च्या जबरदस्त यशानंतर राजकुमार राव आणि दिनेश विजन यांनी आणखी एका हॉरर कॉमेडी चित्रपटासाठी हात मिळवला आहे. २०२० मध्ये हा चित्रपट रिलीज होईल.

राजकुमार राव, श्रद्धा कपूर स्टारर ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. अनपेक्षितपणे १०० कोटींपेक्षा अधिक रूपयांचा गल्ला जमवत, या चित्रपटाने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. केवळ इतकेच नाही तर राजकुमार रावला ए-लिस्ट स्टारच्या यादीत नेऊन बसवले. ‘स्त्री’च्या अपार यशानंतर या चित्रपटाचा निर्माता दिनेश विजनने आणखी एक हॉरर कॉमेडी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. होय, ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी ट्वीटरवर याची माहिती दिली आहे. ‘स्त्री’च्या जबरदस्त यशानंतर राजकुमार राव आणि दिनेश विजन यांनी आणखी एका हॉरर कॉमेडी चित्रपटासाठी हात मिळवला आहे. २०२० मध्ये हा चित्रपट रिलीज होईल, असे ट्वीट तरण आदर्श यांनी केले आहे.

या चित्रपटाचे नाव अद्याप फायनल झालेले नाही. या चित्रपटात वरूण शर्माही दिसेल. २०१९ मध्ये शूटींग सुरु होईल आणि २०२० ला हा चित्रपट रिलीज होईल, असेही तरण आदर्श यांनी लिहिले आहे.

या चित्रपटासाठी राजकुमार रावचे नाव फायनल झाले असले तरी अद्याप हिरोईन ठरलेली नाही. आता या चित्रपटात राजकुमारच्या अपोझिट कुण्या अनुभवी हिरोईनची वर्णी लागते की, एखादा नवा-कोरा चेहरा यात दिसतो, ते बघूच.शेवटी सांगायचे म्हणजे, हा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री’चा सीक्वल नसेल. ज्यांनी कुणी ‘स्त्री’ पाहिला, त्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की, या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. याचे कारण म्हणजे, सीक्वलच्या हिशेबानेच ‘स्त्री’ संपवण्यात आला होता. त्यामुळे पे्रक्षक ‘स्त्री’च्या सीक्वलची आतूरतेने प्रतीक्षा करत आहे. पण राजकुमार व दिनेश विजन यांचा हा आगामी चित्रपट सीक्वल नाही तर यात एक नवी कोरी कहाणी पाहायला मिळणार आहे. तेव्हा थोडी प्रतीक्षा ही आलीच.

टॅग्स :राजकुमार राव