अन् राजकुमार रावने चक्क डोक्यावर सिमेंटची पोती वाहून नेलीत...; इतके फक्त एका रोलसाठी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 09:30 AM2021-04-23T09:30:00+5:302021-04-23T09:30:02+5:30
संध्याकाळी काम संपले तेव्हा राजकुमारला या कामाचे 100 रूपये मिळालेत. हे 100 रूपये राजकुमारने वाहिलेल्या सिमेंटच्या पोत्यांची मजुरी नव्हती तर...
राजकुमार राव (Rajkummar Rao) आजघडीचा बॉलिवूडचा सर्वात हरहुन्नरी अभिनेता. राजकुमार आत्तापर्यंत वेगवेगळ्या भूमिका पडद्यावर जिवंत केल्यात आणि त्याच्या या दमदार अभिनयावर चाहते फिदा झालेत. 2010 साली राम गोपाल वर्माच्या ‘रन’ या सिनेमात एक छोटीशी भूमिका साकारणारा राजकुमार आज कुठल्या कुठे पोहोचलाय. कारण काय तर त्याची मेहनत. होय, प्रत्येक भूमिकेसाठी राजकुमार प्रचंड कष्ट घेतो. एका सिनेमासाठी राजकुमारने काय केले तर चक्क दिवसभर मजूरी केली. दिवसभर डोक्यावर सिमेंटची पोती वाहून नेलीत.
या सिनेमाचे नाव होते, ‘सिटी लाईट्स’ (CityLights). 2014 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात राजकुमारने स्थलांतरित कामगाराची भूमिका साकारली होती. हा सिनेमा साईन केला आणि राजकुमारने भूमिकेची तयारी सुरु केली. तो चक्क एका बांधकामाच्या ठिकाणी गेला. मजुर कसे जगतात, किती घाम गाळतात, काय सोसतात, हे पडद्यावर दाखवायचे तर त्याचे चटके स्वत: सोसलेले असायला हवेत. हा विचार करून त्याने एका बांधकामाच्या ठिकाणी चक्क दिवसभर मजुरी करण्याचा निर्णय घेतला.
दिवसभर सोबतच्या मजुरांसोबत त्याने डोक्यावर सिमेंटची पोती वाहून नेलीत. संध्याकाळी काम संपले तेव्हा त्याला या कामाचे 100 रूपये मिळालेत. हे 100 रूपये राजकुमारने वाहिलेल्या सिमेंटच्या पोत्यांची मजुरी नव्हती तर त्यामागे असलेल्या निष्ठेला मिळालेले बक्षिस होते.
याच निष्ठेने राजकुमार आज आघाडीचा स्टार बनवले आहे. नुकताच राजकुमारचा ‘रूही’ हा सिनेमा रिलीज झाला. यानंतर राजकुमार ‘बधाई दो’ या सिनेमात दिसणार आहे. आयुष्यमान खुराणाच्या ‘बधाई दो’चा हा सीक्वल आहे. यात राजकुमारसोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आपण पाहू शकणार आहोत.