सेलिब्रेटी म्हटलं की ते वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. कधी त्यांच्या आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी त्यांच्या आउटफिटमुळे. त्यांचे चाहते त्यांची स्टाइल स्टेटमेंट फॉलो करत असतात. त्यात त्यांच्या लग्नाच्या बाबतीत चाहत्यांमध्ये वेगळीच उत्सुकता असते. प्रत्येकजण आपापल्या आवडीनिवडीनुसार लग्नाचे प्लानिंग करत असतो. नुकतेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा पॉल लग्नबेडीत अडकले आहेत. जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी चंडीगढमधील ऑबेरॉय सुख विलास लक्झरी रिसॉर्टमधील कोहिनूर व्हिलामध्ये सात फेरे घेतले आहेत. त्यानंतर आता नुकतेच ते मुंबईत परतले आहेत. त्यावेळी ते विमानतळावर स्पॉट झाले. तिथे सर्वांच्या नजरा नवीन जोडप्यावर खिळल्या होत्या.
नववधूच्या लूकमध्ये पत्रलेखा खूपच सुंदर दिसत होती. यादरम्यान तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. त्यावेळी राजकुमार रावही पांढऱ्या कुर्ता-पायजमामध्ये खूपच सुंदर दिसत होता. यादरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे, पत्रलेखाच्या मंगळसूत्राने.