Rajnikanth : 'थलायवा' (Thalaiva) रजनीकांतला कोणत्याच परिचयाची गरज नाही. त्यांचा अनोखा अंदाज आणि अभिनयच वेड लावणारा आहे. अनेक दशकांपासून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. हटके स्टाईल हीत त्यांची खरी ओळख आहे. पण त्यांच्या याच वेगळ्या अंदाजाचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. त्यांची नक्कल करायचा प्रयत्न अनेक ब्रॅंड्स कडूनही केला जातो. मात्र आता असे करणे महागात पडणार आहे. कारण रजनीकांत यांनी एक कायदेशीर नोटीसच जारी केली आहे.
साऊथ सुपरस्टार रजनीकांत 'थलायवा' नावाने ओळखले जातात. अनेक लोक तर त्यांची पूजा करतात. कित्येक कुटुंबात त्यांना देवघरात स्थान देले गेले आहे इतकी त्यांची लोकप्रियता आहे. त्यांच्यासारखंच चालायचं, बोलायचं, हसायचं म्हणून त्यांची नक्कल करणारे काही कमी नाहीत. इतकंच काय तर त्यांच्या आवाजाचा, नावाचा वापर करुन AI जनरेटेड इमेज बनवली जाते आणि त्याचा गैरवापर केला जातो. आता मात्र असे कृत्य करणे महागात पडणार आहे.
माध्यमांच्या रिपोर्टनुसार, रजनीकांत यांच्या वकीलांनी एक लेटर जारी करत सर्वांना इशारा दिला आहे. रजनीकांत यांच्या परवानगीशिवाय जे त्यांच्या ओळखीचा गैरवापर करतील त्यांच्यासाठी हा इशारा आहे. रजनीकांत यांची ओळख, प्रसिद्धी आणि सेलिब्रिटी राईट्सचे उल्लंघन करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे लेटरमध्ये नमूद केले आहे. सोबतच रजनीकांत यांची आयडेंटिटी, नाव, आवाज, ओळख याचा वापर करण्यावर नियंत्रण असेल.
अमिताभ बच्चन यांनीही घेतली होती कोर्टात धाव
याआधी काही दिवसांपूर्वीच महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील अशी कायदेशीर नोटीस काढली होती.अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात पर्सनॅलिटी राईट्स अर्थात व्यक्तिमत्व हक्कांसाठी याचिका दाखल केली होती. आपल्या नावाचा, फोटोंचा किंवा आवाजाचा गैरवापर होत असल्याचं पाहून बिग बी चांगलेच संतप्त झाले होते म्हणून त्यांनी थेट कोर्टात धाव घेतली.