Join us

Rajinikanth ला भिकारी समजून 10 रुपये दिले, पण महिलेच्या जेव्हा हे लक्षात आले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 2:56 PM

Rajnikanth is one of the greatest actor, रजनीकांत जेव्हा पायऱ्या चढत होते तेव्हा एक महिलाही त्यांच्यासोबत पायऱ्या चढत होती.

दक्षिणेकडील रसिकांसाठी अभिनयाचा देव म्हणजे रजनीकांत. त्यांच्याशी निगडीत सगळ्याच गोष्टी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांनाही नेहमीच रस असतो.असाच एक किस्सा खुद्द रजनीकांत यांनीच सांगितला होता.

2007 साली शिवाजी चित्रपट हिट ठरला होता. चित्रपटाला मिळालेले यश पाहून मला देवाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. यावेळी सुरक्षेची काळजी घेता मला एका म्हाताऱ्याच्या वेशात मंदिरात पाठविण्यात आले.

 रजनीकांत जेव्हा पायऱ्या चढत होते तेव्हा एक महिलाही त्यांच्यासोबत पायऱ्या चढत होती. महिलेच्या मनात माझ्याप्रती दया आली. तिने मला भिकारी समजून माझ्या हातावर दहा रुपयांची नोट टेकविली. पण मी काही रिअ‍ॅक्ट न होता मंदिरात गेलो. 

देवाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर त्यांच्याजवळ जितकेही पैसे पाकिटात होते ते दान केले. तेव्हा ती महिला तिथेच उभी होती. रजनीकांत यांना ओळखताच तिने त्यांची माफी मागितली. सुपरस्टार रजनीकांतसोबत असाही प्रसंग घडू शकतो, यावर कोणाचाच विश्वास बसला नसेल, हेही तेवढेच खरे. 

 

नुकताच रजनीकांत यांचा 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा केली आहे.