हृतिक रोशन (hrithik roshan) हा बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. 'धूम २', 'कोई मिल गया', 'क्रिश', 'फायटर', 'वॉर' अशा एकापेक्षा एक सिनेमांमधून हृतिकने सिनेसृष्टी गाजली. हृतिकचा कोणताही नवीन सिनेमा असेल तर रिलीजआधीपासूनच त्या सिनेमाची चांगलीच हवा असते. अशातच हृतिक रोशनला वैयक्तिक आयुष्यात एका गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. यामुळे तो स्वतःला बाथरुममध्ये बंद करुन घ्यायचा. हृतिकला नेमकं काय झालं होतं? याचा खुलासा त्याचे वडील राकेश रोशन (rakesh roshan) यांनी केला आहे.हृतिकला झालेला हा गंभीर आजारANI ला दिलेल्या मुलाखतीत राकेश रोशन यांनी हृतिकविषयी खुलासा केला होता. ते म्हणाले की, "हृतिक सुरुवातीपासून हुशार होता. याशिवाय त्याला शिक्षणाची चांगलीच आवड होती. परंतु तो बोलताना हकलायचा. ड शब्दाचा उच्चार करताना त्याला त्रास व्हायचा. त्यामुळे ड चा उच्चार नीट होण्यासाठी हृतिक स्वतःला बाथरुममध्ये बंद करायचा. त्याने स्वतःवर खूप मेहनत घेतली. परिणामी गेल्या १०-१२ वर्षांपासून त्याचं बोलताना हकलणं कमी झालं.""बोलण्याची ही समस्या सुधारण्यासाठी हृतिकने दृढनिश्चय केला होता. सकाळी उठल्यावर तो प्रत्येकी एक तास इंग्रजी, उर्दू आणि हिंदी वर्तमानपत्र वाचायचा. याशिवाय बोलताना अडखळत असल्याने तो शाळेत गप्प गप्प असायचा. त्याचे शाळेचे दिवस खूप त्रासदायक होते. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की, तो कधीही अभिनेता बनू शकत नाही. त्यामुळे अनेक महिने हृतिक निराशेच्या छायेत होता."
याविषयी हृतिक म्हणाला की, "माझे कोणीही मित्र किंवा गर्लफ्रेंड नव्हते. मी खूप लाजाळू होतो आणि शाळेतून घरी आल्यावर मला रडू यायचं. माझ्या मणक्यात समस्या असल्याने मी कधीही नाचू शकत नाही, असं डॉक्टरांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे माझं मन इतकं उदास झालं होतं की रात्रभर जागायचो. माझ्यात शारीरिक व्यंग आहे आणि मी कधीही नाचू शकत नाही, ही भावना मला त्रास द्यायची."