अंतराळवीर राकेश शर्मा यांचा बायोपिक गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. आधी या सिनेमाची ऑफर आमीर खानला देण्यात आली होती मात्र आमीरने या भूमिकेसाठी शाहरुख खानचे नाव सुचवलं होते. शाहरुख खान ही भूमिका करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांत सुरु होती. मात्र आमीरनंतर शाहरुख खानने देखली या सिनेमातून काढता पाय घेतला. फरहान अख्तरचा आगामी डॉन ३ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्यामुळेच शाहरुखने राकेश शर्माच्या बायोपिकसाठी नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.
फर्स्टपोस्टच्या रिपोर्टनुसार शाहरुखने एक्झिट घेतल्यानंतर सिद्धार्थ आणि रॉनी स्क्रूवाला यांनी या भूमिकेसाठी नवा चेहरा घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार या भूमिकेसाठी विकी कौशल आणि कार्तिक आर्यनपैंकी एकाच नाव फायनल होऊ शकते. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे दिग्दर्शक महेश मथाई यांनी कार्तिक आर्यनची भेट घेतली होती. तसेच काही दिवसांपूर्वी विकी कौशलदेखील सिद्धार्थच्या ऑफिसबाहेर दिसला होता. आता या दोघांपैकी सिनेमात नक्की कोणाची वर्णी लागतेय ही आपल्याला थोड्या दिवसांच समजेल.