Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंतने आदिल खानसोबत (Adil Khan) लग्न झाल्याचे फोटो पोस्ट केले आणि एकच चर्चा सुरु झाली. राखीचा हा नवीन ड्रामा अशी टीका तिच्यावर होऊ लागली. इतकंच नाही तर राखीने तिचे नावही बदलले आहे. लग्नानंतर मी इस्लाम धर्म कबूल केला असून आता मी फातिमा हे नाव स्वीकारल्याचं आता राखीने सांगितलं आहे. यावरुन लव्ह जिहादच्या चर्चा जोरदार रंगल्या.
इन्स्टंट बॉलिवूड या पापाराझींच्या इन्स्टाग्राम पेजवर राखी सांगत आहे, 'मला हेच माहित नाही की लव्ह जिहाद काय असतं. मला फक्त लव्ह माहित आहे, आम्ही जातीपातीला मानत नाही. आमच्या नात्यात कोणताच धर्म येत नाही. हो आम्ही निकाह केला आहे, यांनी माझं नाव फातिमा ठेवलं आहे. मी इस्लाम धर्म ही स्वीकारला आहे.माझ्या पतीला परत मिळवण्यासाठी माझं प्रेम मिळवण्यासाठी जे शक्य आहे ते मी केलं.'
राखीच्या या व्हिडिओवर तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे.'जर धर्म जात पात मानत नाही तर का इस्लाम धर्म स्वीकारला असा प्रश्न तिला विचारला जात आहे. ही महिला खोटारडी आणि मूर्ख आहे' अशी कमेंट एका युझरने केली आहे.तर आणखी एकाने कमेंट केली, हे कोणतं प्रेम आहे ज्यामध्ये तुला धर्म आणि नाव बदलावं लागत आहे. सलमान खानची बहिण लग्नानंतरही अर्पिता खानच राहीली, फराह खानचेही लग्नानंतर तेच नाव आहे मग तुझे प्रेम असे कसे.'
याशिवाय राखीने मध्यंतरी एक भगव्या बिकीनीत व्हिडिओ शेअर केला होता. यावरही तिला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले होते.
Rakhi Sawant-Mukesh Ambani : राखी सावंतसाठी मुकेश अंबानी सरसावले, आईच्या उपचारासाठी करतायत मदत
राखी सावंत नुकतीच मराठी बिग बॉस ४ (Bigg Boss marathi 4) मध्ये सहभागी झाली होती. या तिने चॅलेंजर म्हणून घरात प्रवेश केला होता. तिने टॉप ५ पर्यंत मजल मारली. मात्र ९ लाख रुपये स्वीकारत ती नंतर स्पर्धेतून बाहेर पडली. राखीची आई सध्या ब्रेन ट्युमर आजाराशी झुंज देत आहे. तर सात महिन्यांपूर्वीच राखीने आदिल सह निकाह केला आहे.