Join us

VIDEO : राखी सावंतचा बॉयफ्रेन्ड आदिलला जीवे मारण्याची धमकी, ‘ड्रामा क्वीन’चा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 11:02 AM

Rakhi Sawant : बिश्नोई गँगकडून आदिलला धमकी दिली जात असल्याचा दावा राखी सावंतने केला आहे. पुराव्यादाखल राखीने धमकीचा मॅसेजही दाखवला आहे.

Rakhi Sawant Boyfriend Adil Durrani Gets Death Threat : ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant ) हिच्या आयुष्यात आदिल दुर्रानीची (Adil Durrani )एन्ट्री झाली आहे. होय, आदिल कोण तर राखीचा बॉयफ्रेन्ड. गेल्या काही दिवसांपासून आदिलशिवाय राखीचं पानंही हलत नाही. त्याच्यासोबत ती सतत फिरताना दिसते. पण असं असलं तरी राखीच्या आयुष्यातील ड्रामा काही संपायची चिन्हं नाहीत. सध्या राखीच्या आयुष्यात नवा भूकंप आला आहे. होय, तिचा बॉयफ्रेन्ड आदिलला जीवे मारण्याच्या धमकीचे मॅसेज येत आहेत. खुद्द राखीने हा खळबळजनक आरोप केला आहे. बिश्नोई गँगकडून आदिलला धमकी दिली जात असल्याचा दावा तिने केला आहे.

पुराव्यादाखल राखीने धमकीचा मॅसेजही दाखवला आहे. ‘राखी सावंतला सोड नाही तर तुला जीवे मारू,’ असं या मॅसेजमध्ये लिहिलं आहे. या मॅसेजमध्ये बिश्नोई ग्रूपचं नाव आहे. दाऊद हसन नावाच्या एका व्यक्तीने हा मॅसेज पाठवला आहे.

राखी म्हणते, धमकी देणे बंद करा...

बॉयफ्रेन्डला जीवे मारण्याच्या धमकीचे मॅसेज आलेले पाहून राखी थोडी इमोशनल झाली. पण ती घाबरली नाही. धमकी देणाºयालाच तिने धमकावले. ही असली धमकी देणं बंद करा समजलं. माझ्या आदिलला काही झालं ना तर... आधी मला संपवा आणि तुम्ही मला का संपवणार? प्रेम करणं गुन्हा आहे का? तुम्ही लोकांनी कधी प्रेम केलं नाही का? माझ्या आदिलला काहीही व्हायला नको. तुम्ही माझे भाऊ आहात. बहिणीचं संसार उभा करा, तो उद्धवस्त करू नका. आदिल माझा प्राण आहे. त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. आम्ही कुणाचं काय बिघडवलं? असं राखीने म्हटलं आहे

दाऊद हसन नावाच्या कथित व्यक्तीकडून ही धमकी आली असून यामध्ये ‘राखीपासून दूर राहा, आम्ही तुला मारून टाकू, बिश्नोई गँगसे धमकी...’ असं लिहिलं आहे.  याआधी सलमान खान यांचे वडील सलीम खान यांना सुद्धा अशाच पत्राद्वारे जीवे मारायची धमकी मिळाली आहे.

टॅग्स :राखी सावंत