Join us  

Rakhi Sawant : "मी मावशी झाले...", दीपिका आई होताच राखी सावंतला झाला आनंद, मुलीसाठी घेतली खेळणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 11:40 AM

Rakhi Sawant And Deepika Padukone : दीपिका पादुकोणने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ड्रामा क्वीन आणि 'बिग बॉस' फेम राखी सावंतनेही आपला आनंद व्यक्त केला आहे. राखीने दुबईच्या मॉलमध्ये जाऊन बेबी गर्लसाठी खेळणी खरेदी केली आहेत. 

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी समजताच चाहत्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे. दीपिका आणि रणवीरवर लोक अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. याच दरम्यान आता ड्रामा क्वीन आणि 'बिग बॉस' फेम राखी सावंतनेही आपला आनंद व्यक्त केला आहे. राखीने दुबईच्या मॉलमध्ये जाऊन बेबी गर्लसाठी खेळणी खरेदी केली आहेत. 

राखी सावंतचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत राखी आनंदाने नाचताना दिसत आहे. ती रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणला फ्लाइंग किस देते आणि म्हणते, "मी मावशी झाले... दीपिका तुला आठवतंय का? आपण एकत्र डान्स क्लास केला होता. एकत्र करिअरला सुरुवात केली. तू मोठी स्टार झालीस. बायको झालीस आणि आता आई झाली आहेस."

राखी सावंतने यानंतर एक बाहुली विकत घेतली आणि दीपिका पादुकोणला म्हणाली, "मी तुझ्या मुलीसाठी ही बाहुली विकत घेत आहे." यानंतर तिने बरीच खेळणी विकत घेतली. खेळणी दाखवताना ही कशी वाटत आहेत? असा प्रश्नही तिने विचारला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर युजर्स भरभरून कमेंट करत आहेत. राखीने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, ती सध्या दुबईमध्ये आहे.

काही महिन्यांपूर्वीच दीपिका आणि रणवीरने ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता ते आईबाबा झाले आहेत. दीपिकाने लेकीला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्माने दीपिका-रणवीरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दीपिकाने गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गोंडस लेकीला जन्म दिला. गणेश चतुर्थीला रणवीर आणि दीपिका सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर दीपिकाला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.  

टॅग्स :राखी सावंतदीपिका पादुकोणरणवीर सिंग