Join us

Rakhi Sawant Video : राखी सावंतच्या आयुष्यात नवा ड्रामा, रडत रडत पोहोचली पोलिस ठाण्यात...!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 10:14 AM

Rakhi Sawant : होय, शनिवारी रात्री पोलिस ठाण्याबाहेर राखी सावंत ढसाढसा रडताना दिसली. बॉयफ्रेन्ड आदिल दुर्रानीसोबत राखी पोलिस ठाण्यात पोहोचली.

ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्या आयुष्यातील ड्रामा संपण्याचं चिन्ह नाही. रोज नव्या कारणानं ती चर्चेत असते. वेगवेगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकते. सध्या मात्र राखीची दयनीय अवस्था झाली आहे. होय, शनिवारी रात्री ओशिवारा पोलिस ठाण्याबाहेर राखी सावंत ढसाढसा रडताना दिसली. बॉयफ्रेन्ड आदिल दुर्रानीसोबत राखी पोलिस ठाण्यात पोहोचली. पापाराझींनी तिला पोलिस ठाण्यात येण्याचं कारण विचारलं असता तिच्या अश्रूंचा बांध फुटला. कॅमेऱ्यांसमोरच ती ढसाढसा रडू लागली. आपला पूर्वाश्रमीचा पती रितेश आपला छळ करत असल्याचा, आपल्यावर संशय घेत असल्याचा आरोप तिने केला.राखीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओत राखी रडत रडत पूर्वाश्रमीचा पती रितेशवर (Ritesh) गंभीर आरोप करताना दिसत आहे.

(साभार-@tahirjasus) तो म्हणतो, तो मला बर्बाद करेल...व्हिडीओत राखी रडत रडत रितेशवर आरोप करते. ती म्हणते, ‘रितेशने माझे इन्स्टाग्राम व फेसबुक अकाऊंट हॅक केलं आहे. तो मला प्रचंड त्रास देत आहे. माझ्या सर्व सोशल अकाऊंटवर, जीमेलवर त्याने स्वत:चं नाव व नंबर टाकला. आम्ही सोबत असताना तोच माझे सोशल अकाऊंट हँडल करत होता. विभक्त झाल्यानंतर मी माझा पासवर्ड बदलला नाही. पण आता तो माझ्यावर सूड उगवत आहे. तो मला बर्बाद करून सोडेल, अशी धमकी त्याने मला दिला आहे. आम्ही सर्व लोक इन्स्टाग्रामवरून पैसा कमावतो. पण त्याने माझं इन्स्टा अकाऊंट हॅक केलं आहे.’

मला अश्लिल मेसेज येत आहेत. चुकीच्या गोष्टी लिहिल्या जात आहेत. रितेश आता माझा फोनही उचलत नाही आणि माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर घाणेरड्या भाषेत लिहित आहे. मला त्रास देऊ नकोस, अशी विनंती मी त्याला करत आहे. पण त्याला मला बर्बाद करायचं आहे. कारण मी आदिलसोबत आहे. तो कलर्स टीव्हीबद्दलही घाणेरड्या गोष्टी लिहित आहे. चॅनलने मला बॅन करावं, अशी त्याची इच्छा आहे. तो सलमान भाईसोबतचा माझा बॉन्ड खराब करू इच्छित आहे. यावेळी तो आदिलसोबत बिग बॉसमध्ये कशी जातेस, ते बघतो, असं तो म्हणत असल्याचंही तिने सांगितलं. 

राखीचा प्रियकर आदिल दुरार्नीने सांगितलं की, मी राखीचे सोशल मीडिया अकाउंटवर लॉग इन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण यश आले नाही. अनेक प्रयत्न करूनही ती लॉग इन करू शकत नाही. ती यापुढे तिचे गुगल पे किंवा तिचा फोन देखील अ‍ॅक्सेस करू शकणार नाही. 

टॅग्स :राखी सावंत