Join us

Rakhi Sawant : Video - "स्मशानभूमीतून आईच्या अस्थी..."; ढसाढसा रडत राखीने मोदींकडे मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 1:06 PM

Rakhi Sawant : राखी सावंत बऱ्याच दिवसांपासून दुबईत अडकली आहे. आता अभिनेत्रीने तिथून एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे.

ड्रामा क्वीन राखी सावंत बऱ्याच दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे. पण आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती मोठमोठ्याने रडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणतेय की, तिला आता भारतात परत यायचं आहे. तिने दोन वर्ष झाली तरी अजून स्मशानभूमीतून तिच्या आईच्या अस्थी घेतलेल्या नाहीत. तसेच तिने मोदी सरकारकडे देखील मदत मागितली आहे. 

राखी सावंत बऱ्याच दिवसांपासून दुबईत अडकली आहे. आता अभिनेत्रीने तिथून एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे. राखीच्या व्हिडिओमध्ये, पंतप्रधान मोदी, भाजपा, मुंबई पोलीस आणि देशातील सर्व कायदा यंत्रणाला तिला भारतात परत येण्यासाठी मदत करण्याची विनंती करत आहेत. अभिनेत्री म्हणते की तिला तिच्या देशात परत यायचं आहे पण तिला जामीन मंजूर व्हावा, जेणेकरून ती भारतात परत येऊ शकेल.

राखीने अद्याप स्मशानभूमीतून तिच्या आईच्या अस्थी घेतलेल्या नाहीत. ती निर्दोष आहे आणि तिला जाणूनबुजून फसवलं जात आहे. अन्याय होत असल्याचा दावाही तिने केला. "मला दुसऱ्या देशात राहून २ वर्षे झाली आहेत. माझ्या आईचा मृत्यू झाला आहे. माझ्या आईच्या अस्थी घेतलेल्या नाहीत. मला स्मशानभूमीमधून सतत फोन येतो पण मी तिथे जाऊ शकत नाही."

"मी भारतात येताच मला जेलमध्ये पाठवलं जाईल पण कोणत्या गोष्टीसाठी हे मला माहीत नाही, अशा धमक्या मला सतत मिळतात" असं राखीने म्हटलं आहे. राखी सावंतचं हे संपूर्ण प्रकरण तिचा माजी पती आदिल दुर्रानीशी संबंधित आहे. राखीने दुबईमध्ये एक प्रॉपर्टी खरेदी केली होती, त्यानंतर आदिलने तिच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. सोबतच गुन्हाही दाखल करण्यात आला. तेव्हापासून राखी दुबईत असून भीतीपोटी ती भारतात परतली नाही. 

टॅग्स :राखी सावंतभारत