Join us

...अखेर राखी सावंतला अटक; पोलिसांना गुंगारा देण्याचा केला प्रयत्न!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2017 11:02 AM

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत सध्या चांगलीच अडचणीत सापडली आहे. अर्थात यासही तिचे बोलबच्चन ...

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत सध्या चांगलीच अडचणीत सापडली आहे. अर्थात यासही तिचे बोलबच्चन हे एकमेव कारण आहे. काही दिवसांपूर्वी महर्षी वाल्मीकी आणि त्यांच्या अनुयायांप्रती अनुद्गार काढणाºया राखीविरोधात पंजाब, लुधियानाच्या स्थानिक न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्याने राखीची पुर्ती धांदल उडाली आहे. विशेष म्हणजे राखीला अटक करण्यासाठी पंजाब, लुधियाना येथून एक पोलीस पथक मुंबईला तळ ठोकुण असल्याने, राखीची अटक अटळ समजली जात होती. परंतु सहजासहजी पोलिसांच्या हाती लागेल ती राखी कसली. तिने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न केले. परंतु पोलिसांनी तपासाची चक्रे सर्वधुर पसरवित राखीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. लुधियानाच्या स्थानिक न्यायालयाने ९ मार्च रोजी राखी विरोधात अटक वॉरंट बजावले होते. त्यानंतर तातडीने दोन पोलिसांना मुंबईला पाठविण्यात आले होते. मात्र जेव्हा हे पोलीस राखीने दिलेल्या पत्त्यावर पोहचले तेव्हा ती त्या पत्त्यावर राहत नसल्याचे समोर आल्याने पोलीसही दंग राहिले. यावेळी पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांना राखीविषयी विचारपुस केली. मात्र त्यांनी राखी येथे कधी आलीच नसल्याने तिचा येथे राहण्याचा संबंधच नसल्याचे सांगितले. लोकांचे हे उत्तर ऐकून पोलीसही चक्रावले होते. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित राखीला अटक केली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनवाई १० एप्रिल रोजी आहे.अ‍ॅड. नारिंदर आदिया यांनी जुलै २०१६ मध्ये धार्मिक भावना भडकाविणे आणि अपमानास्पद शब्दांचा उच्चार केल्याप्रकरणी राखी सावंतच्या विरोधात याचिका दाखल केली होती. याचिकेत राखीने महर्षी वाल्मीकी आणि त्यांच्या अनुयायांविषयी अपशब्दांचा वापर केल्याचे म्हटले होते. याप्रकरणी राखीला वारंवार समन्सही बजावण्यात आले होते. मात्र राखी एकदाही न्यायालयात उपस्थित राहू शकली नाही. त्यामुळे सुरुवातीला न्यायालयाने राखीच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट काढले होते. मात्र राखी न्यायालयात उपस्थित राहू शकली नसल्याने तिच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. त्यानुसार लुधियाना पोलिसांना राखीला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. आता राखीला अटक करण्यात आली असून, तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे हे प्रकरण आता काय वळण घेणार हे बघणे मजेशीर ठरेल.  ...हे आहे प्रकरणपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राखीवर आरोप लावण्यात आले की, गेल्यावर्षी तिने एका खासगी टीव्ही चॅनलवर रामायण लेखक महर्षी वाल्मीकी यांच्याविरोधात अपशब्दांचा वापर करीत समस्त वाल्मीकी समुदायाच्या भावना दुखाविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अ‍ॅड. नारिंदर आदिया यांनी राखीच्या विरोधात याचिका दाखल केली होती. याच प्रकरणी न्यायालयाने तिच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे.