Join us

'शांत आहे तर शांत राहू द्या; अंत पाहू नका', राखी सावंतचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 18:44 IST

माझ्या मूळ रुपात आणण्याचा प्रयत्न करु नका', या शब्दात ट्रोल करणाऱ्यांना राखींने प्रत्युत्तर दिलं. 

ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत ही कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. राखी सावंतचे व्हिडिओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच राखी आपल्या आयुष्यामधील पहिला उमराह करून भारतामध्ये दाखल झाली. राखी सावंतने मक्का येथील अनेक व्हिडिओ आणि फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. तिचे व्हिडीओ पाहून हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. आता राखीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. '

राखीने म्हटलं की, मी उमराह केला, अबाया परिधान करते तर काही लोक याला नाटक म्हणत आहेत. काही लोक मला इस्लामची परिभाषा शिकवत आहे. हे लोक इस्लामचे ठेकेदार आहात का? असा सवाल राखीने केला. पुढे ती म्हणाली, 'मी शांत आहे तर शांत राहू द्या. अंत पाहू नका, भडकवण्याचा प्रयत्न करु नका. माझ्या मूळ रुपात आणण्याचा प्रयत्न करु नका', या शब्दात ट्रोल करणाऱ्यांना राखींने प्रत्युत्तर दिलं. 

काही दिवसांपुर्वी अभिनेत्री गौहर खानने अप्रत्यक्षपणे राखी सावंतवर प्रसिद्धी स्टंट म्हणून धार्मिक गोष्टींचा वापर केल्याचा आरोप  केला होता. तिने पोस्टमध्ये लिहलं होतं की," अबाया घातल्याने कोणी मुस्लिम होत नाही. इस्लामचे सौंदर्य समजून घेण्याच्या लायकीचे काही लोक नाहीत. विश्वास हा हृदयात असतो. यासाठी कॅमेऱ्यांची गरज नसते. भारत किंवा सौदीतील इस्लाम बोर्डाने प्रसिद्धी स्टंटवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून लोक एखाद्या पवित्र गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत. गौहर खानच्या पोस्टचे नेटकऱ्यांनी समर्थन केले होते. ड्रामेबाज म्हणून अनेकांनी तिला ट्रोल केले होते. यावर आता राखीने थेट शब्दात उत्तर दिलं आहे.  

राखी सावंत ही केल्या काही दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्यानंतर राखीने इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि आपले नाव बदलून फातिमा ठेवले होते. सध्या दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. आदिलच्या म्हणण्यानुसार, राखीने त्याला फसवलं आणि अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, आदिलने तिच्याशी गैरवर्तन केलं. 

टॅग्स :राखी सावंतबॉलिवूड