ड्रामा क्वीन राखी सावंत सतत विविध कारणांरून चर्चेत असते. राखीने मीडियासमोर आता पुन्हा एकदा असं काही म्हटलं आहे ज्यामुळे युजर्स पुन्हा एकदा तिला ट्रोल करत आहेत. राखीने तिच्यावर बायोपिक बनत असल्याचं सांगितलं. यावरून युजर्स तिची मजा घेत आहेत. अभिनेत्री राखी सावंत मुंबई विमानतळावर असताना तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
"मी बंगळुरू, म्हैसूरला जात आहे. आता वेळच सांगेल की तिथे काय काय होणार आहे. माझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तिथे माझा बायोपिक लाँच होत आहे" असं म्हटलं. राखीचं हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी तिला बायोपिकमध्ये कोण काम करणार असं विचारलं. याच्या उत्तरात राखी म्हणते, "मला स्वतःला अभिनय करायचा होता, पण मला वाटतं की आलिया भट आणि विद्या बालन खूप चांगला अभिनय करतील. दोघीही खूप छान अभिनेत्री आहेत."
राखी सावंतवर बायोपिक बनवला जात आहे हे ऐकून युजर्स हसत आहेत. तर काहींनी तिची खिल्ली देखील उडवली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राखीने काही दिवसांपूर्वी आदिलसोबतच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. आदिल खान दुर्रानी तिला काम मिळवून देण्यास सांगत असल्याचं दिसत आहे. राखीने पुराव्यासह आदिलसोबतच्या तिच्या निकाहाचे फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले आहेत.
राखीने आदिलला काम मिळावे या मागणीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. राखीने इन्स्टाग्रामवर तिच्या आणि आदिलमधील काही जुन्या पर्सनल चॅट्सचा खुलासा केला आहे, जिथे मेसेजमध्ये आदिल इंडस्ट्रीत काम मागताना दिसत आहे. स्क्रीनशॉट शेअर करत राखीने कॅप्शनमध्ये लिहिलं, "मला माहित होतं की बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी आणि प्रसिद्ध होण्यासाठी सर्व काही केलं आहे. लोकप्रियतेसाठी माझा वापर केला, मी इस्लामिक नियमांचे पालन केलं आणि आता त्याने माझा विश्वासघात केला." राखीने उर्दू भाषेत लिहिलेल्या दुसर्या पोस्टमध्ये तिचं मॅरेज सर्टिफिकेट देखील शेअर केले. यासोबतच राखी आणि आदिल एकमेकांसोबत निकाह करत असल्याचा व्हि़डीओ देखील आहे. सर्टिफिकेटवर फातिमा स्पष्टपणे दिसत आहे.