ना-ना उपद्व्याप करून चर्चेत राहणारी राखी सावंत हिचे सीक्रेट वेडिंग आणि तिचा पती याबद्दलचा सस्पेन्स अखेर संपला. होय, राखीने खरंच लग्न केले का? या प्रश्नाचे उत्तर आता मिळालेय. कारण आता राखीने खरोखर लग्न केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. रितेश नावाच्या एनआरआयशी राखीने गुपचून लग्न केले होते. पण या रितेशचा चेहरा अद्यापही कोणी पाहिला नव्हता. त्यामुळे राखीचे हे लग्न म्हणजे नेहमीप्रमाणे तिचा ‘ड्रामा’ असावा, असेच सगळ्यांना वाटत होते. पण आता राखीचा पती प्रथम मीडियासमोर आला.
रितेशने ‘स्पॉटबॉय’ या बेवसाईटला मुलाखत देत राखी व त्याचे लग्न झाल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केले. केवळ इतकेच नाही तर राखीबद्दल तो भरभरून बोलला. राखीसारखी महिला मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. ती कॅमे-यासमोर कशीही असो पण माझ्यासाठी ती देवाने दिलेली सुंदर भेट आहे. तिच्यासारखी पत्नी मिळाल्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो,असे रितेश यावेळी म्हणाला.