बडी बडी बातें करुन नेहमीच लाइमलाइटमध्ये राहणारी राखी कधी काय करेल आणि काय बोलेल याचा नेम नाही.... लाइमलाईटमध्ये राहण्यासाठीचा आटापिटा करणारी राखी योगगुरु बाबा रामदेववर लट्टू झाली होती. बाबा रामदेव मला लग्नासाठी होकार देत असतील तर, मी एका पायावर त्यांच्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे.
यावर बाबा रामदेव यांनीही राखीने हैराण करून सोडल्याचे सांगितले होते. लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत ती माझ्या पाठी पडली असल्याचे त्यांनी सांगितले होते. एका शोच्या मंचावर बाबा रामदेव आणि राखी आमने- सामने आले तेव्हा राखीने त्यांना पाहताच मला तुमच्यासोबतच लग्न करायचे सांगिुतले. आता राखीला काय बोलायचे म्हणून दिल्ली मै बहोत कुँवारे लडके पडे है असे सांगितले होते. तिच्याविषयी अधिक न बोललेच बरे ,बहोत ही बेशरम लडकी है राखी असे सांगत स्वतःची सुटका करून घेतली होती.
बॉलिवूडमध्ये फिटनेस आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक वेळा बाबा रामदेवचे कौतुक करताना दिसते. शिल्पा शेट्टी आणि बाबा रामदेव यांची कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात जुगलबंदी पाहायला मिळते. बाबा रामदेव यांनी गेल्या काही वर्षात योगगुरु म्हणून देशातच नाही तर परदेशात लौकिक मिळवला आहे. शिल्पाने अनेक प्रसंगी सांगितले आहे की, ती योगगुरू बाबा रामदेव यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे पालन करते. शिल्पा शेट्टीने बाबा रामदेवसह वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या योग शिबिरातही सहभाग घेतला होता. योगाभ्यास केल्यामुळेच शिल्पा शेट्टीचे आयुष्य पुन्हा रुळावर आले आहे असल्याचे ती सांगते.