राखी सावंतला चर्चेत राहण्यासाठी फक्त मुद्दा हवा, तसा तो सापडला. होय, कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असताना ड्रामा क्वीन राखी सावंत गप्प कशी राहणार? होय, राखीला कोरोना व्हायरसच्या रूपात एक मुद्दा मिळाला आणि तिने व्हिडीओ शेअर केला. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मी चीनला पोहोचली असल्याचे राखी या व्हिडीओत सांगतेय. विशेष म्हणजे, आता कोरोना व्हायरसला समुळ नष्ट करूनच थांबेल, असा दावाही या बयेने केला आहे.हा व्हिडीओ फ्लाईटमधील आहे. या व्हिडीओत ती कोरोना व्हायरलबद्दल बोलतेय. मला या व्हायरसची भीती नाही. मी चीनला जातेय. अमेरिकेच्या नासाकडून मी या व्हायरसला समूळ नष्ट करण्यासाठी औषध मागवले आहे. आता चीनमध्ये जाऊन हा व्हायरस संपवूनच मला चैन पडेल, असे ती म्हणतेय. माझ्यासाठी प्रार्थना करा, हे सांगायलाही ती विसरलेली नाहीये. व्हिडीओत राखी रेड कलरच्या आऊटफिटमध्ये आहे. तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. एकंदर काय तर हा राखीचा आणखी एक नवा ड्रामा आहे.
काही दिवसांपूर्वी राखीने असाच एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. ‘चाहत्यांनो मी सध्या युकेत आहे आणि पुन्हा बॉलिवूडमध्ये परण्याचा निर्णय मी घेतलाय. कारण युकेत माझे अजिबात मन रमत नाही. आईच्या आॅपरेशनसाठी मी मुंबईत आली होती. इथे सगळे चांगले आहे. लंडनची क्वीन माझी फॅन आहे. विमानतळ अगदी घराशेजारी आहे. पण असे सगळे असूनही मी आनंदी नाही. दीपिका पादुकोण, सलमान खान, शाहरूख खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, अक्षय कुमार, करण जोहर अशा सगळ्यांचे मला रोज कॉल येतात. ते सगळे मला बॉलिवूडमध्ये परत येण्याची विनंती करत आहेत. शेवटी मी त्यांचे मनोरंजन करते, असे काय काय राखी या व्हिडीओत बरळताना दिसली होती.