Rakhi Sawant : "माझ्या भावाचा पाठलाग करणं सोडा"; सलमानसाठी राखीने मागितली माफी, काढल्या उठाबशा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 10:26 AM2023-03-27T10:26:35+5:302023-03-27T10:37:06+5:30
Rakhi Sawant And Salman Khan : पुन्हा एकदा राखी चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये ती उठाबशा काढताना दिसत आहे.
ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. तिचा पती आदिल खान दुर्रानीवर तिने गंभीर आरोप केले असून तो सध्या जेलमध्ये आहे. ती सातत्याने याबाबत नवनवीन खुलासे करत आहे. आता पुन्हा एकदा राखी चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये ती उठाबशा काढताना दिसत आहे. अभिनेत्रीने पापाराझींशी संवादही साधला. त्यावेळी तिने अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यावर आपली प्रतिक्रिया दिली.
राखीने सलमान एक दिग्गज व्यक्ती असून त्याच्याबद्दल कोणीही वाईट विचार करू नये, असं म्हणत सलमान खानचं समर्थन केलं. मीडियाशी बोलताना राखी सावंत म्हणाली - "मी म्हणते सलमान खान एक चांगला माणूस आहे. तो गरीबांचा दाता आहे, एक महापुरुष आहे.. सलमान भाईसाठी प्रार्थना करा, तो लोकांसाठी खूप काही करतो. सलमान भाईच्या शत्रूंचे डोळे फुटू दे , त्याची स्मरणशक्ती जावो.. माझा भाऊ सलमानबद्दल कोणीही वाईट विचार करू नये, अशी मी अल्लाहला प्रार्थना करते."
राखी सावंतने बिश्नोई समाजाची माफी मागितली. कान पकडून उठाबशा काढल्या. हात जोडून ती सलमान खान भाईच्या वतीने बिश्नोई समाजाची माफी मागते. ती म्हणते की अभिनेत्यावर वाईट नजर ठेवू नका. त्यांना टार्गेट करू नका. राखी सावंतने सलमान खानविरोधातील मुलाखतींवर आपले मत मांडले. ती म्हणाली, "जे लोक सलमान भाईच्या विरोधात मुलाखती देत आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की त्यांनी तुमचं काय वाईट केलं आहे. का माझ्या भावाच्या मागे हात धुवून लागला आहात?"
"माझा भाऊ खूप चांगला माणूस आहे. कृपया त्याचा पाठलाग करणं थांबवा. सलमान भाऊ खूप श्रीमंत आहे पण तो सर्व काही लोकांसाठी करतो.त्याने माझ्या आईसाठी खूप काही केले आहे." या व्हिडिओनंतर लोकांनी कमेंटही केल्या. एका युजरने लिहिले - राखी तुला सलाम. प्रसारमाध्यमांमध्ये बिश्नोई यांच्याबद्दल खुलेपणाने बोलत आहे. हे धाडसाचे काम आहे. तर अनेकांनी टीका केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"