Join us

'मी पॉर्नस्टार आहे हे..'; तोकड्या कपड्यांमुळे ट्रोल करणाऱ्यांना राखींचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 12:50 PM

Rakhi sawant: वैयक्तिक आयुष्यासोबतच राखी तिच्या वादग्रस्त विधान आणि अतरंगी कपडे यांच्यामुळेही चर्चेत येत असते. बऱ्याचदा राखीला तिच्या तोकड्या आणि तंग कपड्यांमुळे ट्रोल केलं जातं.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. आदिल खान दुर्रानी याने राखीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर राखीनेदेखील त्याच्या आरोपांवर प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या राखी चांगलीच चर्चेत आहे. इतकंच नाही तर वैयक्तिक आयुष्यासोबतच राखी तिच्या वादग्रस्त विधान आणि अतरंगी कपडे यांच्यामुळेही चर्चेत येत असते. बऱ्याचदा राखीला तिच्या तोकड्या आणि तंग कपड्यांमुळे ट्रोल केलं जातं. यामध्येच अनेकांनी तिचा पॉर्नस्टार म्हणूनही उल्लेख केला होता. या ट्रोलर्सला आता राखीने उत्तर दिलं आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात राखीने आदिल खान दुर्रानीसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाच्या काही दिवसांमध्येच दोघांमध्ये वादविवाद झाले. परिणामी, राखीने आदिलवर गंभीर आरोप केले. ज्यामुळे त्याला तुरुंगात जावं लागलं. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आदिलने राखीवर अनेक आरोप केले. या आरोपांवर राखीनेदेखील एका मुलाखतीच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर दिलं. मात्र, ही मुलाखत पाहिल्यावर अनेकांनी तिला ट्रोल करत पॉर्नस्टार म्हटलं आहे. या ट्रोलिंगवर राखीने उत्तर दिलं आहे. राखीने अलिकडेच फिल्मग्यानला एक मुलाखत दिली. 

"मी पॉर्नस्टार कधी झाले? पॉर्नस्टारचा अर्थ काय असतो हे तरी माहितीये का? शरीरसंबंध ठेवणे, अवैध संबंध ठेवणे, अंगप्रदर्शन करणे. मी आतापर्यंत असं कधीबी काहीही केलेलं नाही. जर आदिलसोबत माझे संबंध असतील तर मी त्याच्यासोबत लग्न केलं आहे. त्यावेळी मी त्याची जात, धर्म काहीही पाहिलं नाही. आमच्याकडून चूक झाली, आम्ही लग्न केलं", असं राखी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "ज्या खऱ्या पॉर्नस्टार असतात त्यांना तुम्ही आरतीने ओवाळता. आणि, जी साधी मुलगी आहे तिला पॉर्नस्टार बनवून टाकता. छान..धन्यवाद. मी सगळं मान्य करेन. पण मी पॉर्नस्टार आहे हे कधीच खपवून घेणार नाही. हा नको तो आरोप मी माझ्यावर लावून घेणार नाही. मी पॉर्नस्टार नाही."

दरम्यान, आदिल आणि राखीच्या वादात आता राखीच्या मैत्रिणीनेही उडी घेतली आहे. राखीची बेस्ट फ्रेंड असलेल्या राजश्रीनेही तिच्यावर अनेक आरोप केले आहेत. इतकंच नाही तर आदिल खान, राजश्री आणि शर्लीन चोप्रा या तिघांनी राखीवर अनेक आरोप केले आहेत. 

टॅग्स :राखी सावंतसेलिब्रिटीटेलिव्हिजन