Join us

तुझ्याकडे करोडो रूपये आहेत, देशाची थोडी सेवा कर ना...! राखी सावंतचा कंगनासोबत ‘ले पंगा’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:30 AM

राखीने थेट ‘पंगा गर्ल’ला दाखवला आरसा, व्हिडीओ पाहा

ठळक मुद्देतूर्तास राखीचा हा संदेश आणि त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ‘पंगा गर्ल’ला राखीने दिलेला संदेश लोकांना आवडला आहे, असेच म्हणायला हवे.

कोरोनामुळे देशात हाहाकार माजला असताना आता राखी सावंतने (Rakhi Sawant) थेट बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतसोबत  (Kangana Ranaut)  पंगा घेतला आहे. होय, कंगनाने गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर वाटायला हवेत, असे राखीने म्हटले आहे.बिग बॉस 14 मधून बाहेर पडलेली राखी सध्या जाम चर्चेत असते. घराबाहेर पडली रे पडली की, तिचा व्हिडीओ समोर येतो आणि कॅमे-यासमोर राखी काही ना काही मजेदार करते. या ताज्या व्हिडीओतही राखीचा हा मजेदार अंदाज पाहायला मिळतोय. 

चेह-यावर दोन दोन मास्क आणि दोन्ही हातात सॅनिटायझरची बॉटल घेऊन राखी कारमधून उतरते आणि बाहेर येताच चारही बाजूंनी सॅनिटायजर फवारते. देखो, तुमलोग कोरोना को पालो मत, उसको जवान मत होने दो, वो अभी बच्चा आहे, असे काय काय म्हणते आणि अखेरीस कंगनावर येते.व्हिडीओच्या शेवटी ती कंगनाला संदेश देते. ‘कंगनाजी, आप देश की सेवा किजीए ना, आपके पास करोडो रूपये है, थोडा ऑक्सिजन खरीदिए और लोगों में बांटिए’, असे ती म्हणते.आता राखीचा हा संदेश कंगना किती मनावर घेते, ते बघूच. पण तूर्तास राखीचा हा संदेश आणि त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ‘पंगा गर्ल’ला राखीने दिलेला संदेश लोकांना आवडला आहे, असेच म्हणायला हवे.

 कंगना राणौतच्या त्या ट्विटने सगळेच ‘हैराण’!!

सततच्या टिवटिवीमुळे चर्चेत राहणा-या कंगना राणौतचे एक ट्विट सध्या ट्विटरवर ट्रेंड करतेय. होय, मोदीजींना देशाचे नेतृत्व करता येत नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशा आशयाचे तिचे ट्विट क्षणात व्हायरल झाले होते आणि चक्क कंगनाने मोदींच्या राजीनाम्याची मागणी केलेली पाहून पाहून क्षणभर अनेकांना धक्का बसला होता. कट्टर भाजप समर्थक असलेली, इतकेच नाही तर  मोदी माझ्यासाठी पित्यासमान आहेत, म्हणणारी कंगना त्यांच्या राजीनामाच्या मागणी कशी करू शकते? असा प्रश्न अनेकांना पडला होता, पण कंगनाची ही मागणी उपरोधिक होती. एका ट्रोलर्सला फैलावर घेत कंगनाने हे ट्विट केल होते.‘मोदींना देशाचे नेतृत्व कसे करावे कळत नाही...कंगनाला अभिनय येत नाही़ सचिनला बॅटिंग येत नाही आणि लता दीदींना गाता येत नाही... पण या ‘चिंदी’ ट्रोलर्सला सर्व काही येते़ मोदीजी कृपया राजीनामा द्या आणि विष्णु अवतारातील या ट्रोलर्सना देशाचे पंतप्रधान बनवा,’ असे उपरोधिक ट्विट तिने केले होते. गेल्या काही दिवसांपासून ट्रोलर्स  मोदींवर निशाणा साधत आहेत. मोदींमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली, असा आरोप अनेक ट्रोलर्सनी केला आहे. याच ट्रोलर्सनी कंगनाने उपरोधिक शब्दांत उत्तर दिले होते. 

टॅग्स :राखी सावंतकंगना राणौत