राखी सावंत सध्या सोशल मीडियावर कोणत्याना कोणत्या गोष्टीला घेऊन चर्चेत असते. राखीने पुन्हा एकदा एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखीने लग्नाला घेऊन मोठा खुलासा केला आहे. राखीने एनआरआय रितेशसोबत सीक्रेट मॅरेज केले आहे. मात्र या व्हिडीओत राखीने पहिल्या पतीबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
यावर राखी चांगलीच संतापली होती. शहनाज गिलच्या ड्रामेबाजीला कंटाळून शेफाली जरीवालाने शहनाजला ‘पंजाबची राखी सावंत’ असे म्हटले होते. नेमक्या याच कारणावरून राखी भडकली आहे. राखीने यासंदर्भात एक नाही तर तीन व्हिडीओ शेअर केले आहेत. सलमान खान तू हे होऊच कसे दिलेस? असा सवाल तिने या व्हिडीओ केला आहे. त्यावर राखी म्हणाली होती की, ‘बिग बॉस 13’मध्ये माझी टिंगल केली जाते, मला बदनाम केले जाते, म्हणजे काय? असा संतप्त सवाल तिने केला होता. विशेष म्हणजे, केवळ ‘बिग बॉस 13’वर नाही तर हा शो होस्ट करणारा सलमान खान याच्यावरही राखीने आपली भडास काढली होती.