Join us

राखी सावंतला न्यायालयाचा धक्का, अंतरिम जामीन नाकारला; 'ड्रामा क्वीन'ला अटक होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 5:42 PM

आयपीसी कलमांतर्गत राखीविरोधात मानहानीची तक्रार आहे.

'ड्रामा क्वीन' राखी सावंतचा पती आदिल दुर्रानीने दाखल केलेल्या तक्रारीप्रकरणी राखी सावंतच्या अडचणीत वाढ झाली आहे. राखीने आदिलचे प्रायव्हेट व्हिडिओ लीक केल्याप्रकरणी कोर्टात केस सुरु आहे. आयपीसी कलमांतर्गत राखीविरोधात मानहानीची तक्रार आहे. तर आता नुकतंच मुंबई सत्र न्यायालयाने राखी सावंतचा अंतरिम जामीन नाकारला आहे. 

राखी सावंतने 25 ऑगस्ट 2023 रोजी एका टीव्ही शोमध्ये दोन व्हिडिओ दाखवले होते. हे 25 ते 30 मिनिटांचे व्हिडिओ होते ज्यात दोघंही इंटिमेट झालेले दिसत आहेत. यानंतर तिच्याविरोधात आयपीसी कलम अंतर्गत मानहानीची केस दाखल झाली होती. 8 जानेवारी रोजी यासंदर्भात आदेश पारित करण्यात आला होता. याविरोधात राखी सावंतने अंतरिम जामीन अर्ज केला. त्यात तिने म्हटले की आदिलविरोधात आधीच मारहाणसहित अनेक आरोप आहेत. माझ्याविरोधात असा कोणताही आरोप नाही आणि मी चौकशीत सहकार्य केलं आहे.  मात्र विरुद्धपक्षाने तिच्या या याचिकेला विरोध करत सांगितले की ते व्हिडिओ राखीने व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. 

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सांगितले, 'घटनेतील तथ्य, आरोप आणि परिस्थितीवर विचार करुन अंतरिम जामीन नाकारण्यात येत आहे.' न्यायालयाने गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी राखीला अंतरिम जामीन दिला होता. तसंच हायकोर्टात याचिका करण्यासाठी तिला 11 जानेवारी 2024 पर्यंतचा वेळ दिला होता. 

टॅग्स :राखी सावंतन्यायालय