Join us

व्हॅलेंटाईन डेला राखी सावंतने शेअर केला 'हा' खास Video; ऑडिओमध्ये लपलंय आदिलसाठी उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 15:34 IST

Rakhi Sawant : व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने राखी सावंतने तिचा पती आदिलसाठी काही व्हिडिओ शेअर केले आहेत.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप जास्त चर्चेत आहे. राखी सावंतच्या प्रेमविवाह आणि धर्मांतरानंतर तिच्या पतीने फसवणूक आणि मारहाण केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. राखी सावंतचा पती आदिल खान याच्यावरही बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप बोलली आहे आणि लग्नाबद्दल गुपित उघड केलं आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने राखी सावंतने तिचा पती आदिलसाठी काही व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये राखी सावंत तिच्या पतीसोबत कारमध्ये बसलेली दिसत आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती तिच्या पतीसोबत फोटो काढताना दिसत आहे. दोन्ही व्हिडिओंमध्ये राखी सावंतने इन्स्टा रीलसह बॅकग्राउंड ऑडिओचा वापर केला आहे.

पहिल्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंड ऑडिओद्वारे राखी सावंत म्हणाली, "मला तो दिवस आयुष्यभर आठवेल, जेव्हा... तू मी रडत असताना फोन डिस्कनेक्ट केला होतास." दुसऱ्या व्हिडिओमध्ये राखी सावंतने जो व्हॉईस-ओव्हर टाकला आहे. त्यामध्ये ती म्हणते, "आपल्यासोबत जे काही घडते त्या प्रत्येक गोष्टीचा आपण बदला घेऊ शकत नाही. पण निसर्ग ते घेतो. मी माझा निर्णय निसर्गावर सोडतो."

राखी सावंतने हे व्हिडrओ शेअर करत कॅप्शनमध्ये  #Valentine'sDay असं लिहिलं आहे. राखी सावंतसाठी हा व्हॅलेंटाईन डे चांगला राहिला नाही. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी राखी सावंतला खंबीर राहून आयुष्यात पुढे जाण्यास सांगितले आहे. राखी सावंत बऱ्याच दिवसांपासून असे व्हिडीओ टाकत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :राखी सावंत