Join us

पांढरे केस, सुरकुतलेला चेहरा...; ‘म्हातारी’ Rakhi Sawant पाहिली का? हिला झालंय तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 11:21 IST

Rakhi Sawant Shocking Transformation : राखी सावंतला ड्रामा क्वीन म्हणतात ते उगाच नाही. चाहत्यांना एंटरटेन करण्याची एकही संधी राखी सोडत नाही. होय, सध्याचा राखीचा लुक पाहाल तर थक्क व्हाल.

ठळक मुद्देराखीच्या या लुकवर अनेक सेलेब्सनी कमेंट केल्या आहेत व तिच्या लुकचे कौतुक केले आहे.

राखी सावंतला (Rakhi Sawant) ड्रामा क्वीन म्हणतात ते उगाच नाही. चाहत्यांना एंटरटेन करण्याची एकही संधी राखी सोडत नाही. होय, सध्याचा राखीचा लुक (Rakhi Sawant Shocking Transformation)पाहाल तर थक्क व्हाल. तिने स्वत: सोशल मीडियावर स्वत:चे काही फोटो शेअर केले आहेत. पांढरे केस, चेह-यावर सुरकुत्या,गळ्याला पट्टा आणि डोळ्यावर चष्मा असा तिचा लुक पाहून चाहते हैराण आहेत.सध्या राखीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ही कोण आहे? असा प्रश्न करत राखीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.

या फोटोत म्हातारी दिसत आहे. अर्थात ही सर्व मेकअपची कमाल आहे. राखीने या मेकअपचा व्हिडीओही शेअर केला आहे. यात ती 80 वर्षाच्या वृद्ध महिलेच्या गेटअपमध्ये डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे. 

पण तरीही म्हातारीचा हा वेश कशासाठी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यामागचे कारण आहे, नवी भूमिका. होय, सब वाहिनीवरील ‘बेगम बादशाह’ या मालिकेत राखीला 80 वर्षांच्या महिलेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.  राखीचा हा बदलेला अवतार 9 ऑक्टोबरला 7.30 ते 11 सोनी सब वाहिनीवर देखील पाहता येणार आहे.

राखी तू म्हातारी झालीस तरी सेक्सीच दिसणार...राखीच्या या लुकवर अनेक सेलेब्सनी कमेंट केल्या आहेत व तिच्या लुकचे कौतुक केले आहे.  जसलीन मथारूने देखील तिच्या या लुकवर कमेंट केली आहे. ‘ राखी तू कधीच अशी दिसणार नाहीस. म्हातारी झालीस तरी तू सेक्सीच दिसणार,’ अशी कमेंट जसलीन मथारूने केली आहे.  

 

टॅग्स :राखी सावंत