Join us

प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणी या अभिनेत्रीनेच केली होती पोलखोल, केले होते धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 3:58 PM

राखी सावंतच्या खासगी आयुष्याबद्दलही कायम चर्चा असते. चर्चेत कसे राहायचे हे राखीला चांगलेच माहिती आहे.

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, आयटम गर्ल, एक अशी व्यक्ती जिच्यासाठी चर्चेत राहणं काहीच अवघड नाही, ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. ती कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीच्या खासगी आयुष्याबद्दलही कायम चर्चा असते. चर्चेत कसे राहायचे हे राखीला चांगलेच माहिती आहे.

'बालिका वधू' मालिकेतून प्रसिद्ध झालेली प्रत्युषा बॅनर्जीनेही आत्महत्या करत स्वःचे जीवन संपवले होते. त्यावेळीसुद्धा राखी सावंतने पत्रकार परिषद बोलवत प्रत्युषाने आत्महत्या केल्याची अनेक कारणं सांगितली होती. त्यातले सगळ्यात महत्त्वाचे कारण राखीने सांगताच सा-यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अनेकजण प्रत्युषाच्या मृत्यूबद्दल हळहळ, दु:ख व्यक्त करत असताना अभिनेत्री राखी सावंतने मात्र घरातील सीलिंग फॅनवर बंदी घालण्याची अजब मागणी केली होती.

घरामध्ये असणारे सीलींग फॅनच प्रत्युषाच्या आत्महत्येचे मुळ कारण आहे. मुळात सीलींग फॅनवरच बंदी आणली पाहिजे. पंख्याला लटकून आत्महत्या करण्याचे प्रमाणही कमी होईल असा अजब - गजब फंडाच राखीने सांगिला होता. राखी सावंतच्या या वक्तव्यावर चाहत्यांचा रोष शिगेला पोहोचला आणि त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. सीलिंग फॅन काढून टाका आणि टेबल फॅन किंवा एसी वापरा अशी मागणी राखी सावंतने केली होती. याबाबत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्येक घरातून सीलिंग फॅन हद्दपार करण्याची विनंती केल्याचे म्हटले होते. दरम्यान राखी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येचा वापर करुन घेत असल्याबद्दलही तिच्यावर जबरदस्त टीका झाली होती.