Join us  

'कांतारा' फेम ऋषभ शेट्टी करणार राखी सावंतच्या बायोपिकचं दिग्दर्शन? अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 12:19 PM

राखीच्या बायोपिकचं दिग्दर्शन कोण करणार? तिच्या चित्रपटात काम कोण करणार? असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. आता याबाबत माहिती समोर आली आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच ड्रामा क्वीन राखी सावंतने तिच्या आयुष्यावर बायोपिक येणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून राखीच्या बायोपिकचं दिग्दर्शन कोण करणार? तिच्या चित्रपटात काम कोण करणार? असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. आता याबाबत माहिती समोर आली आहे. 

राखीने तिच्या बायोपिकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट किंवा विद्या बालनने काम करावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. चित्रपटाच्या टीमकडून आलिया आणि विद्याला याबाबत विचारणा केल्याचंही राखीने सांगितलं होतं. आता राखीने चित्रपटाच्या दिग्दर्शकाबद्दल अपडेट दिली आहे. 'कांतारा' चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीने बायोपिकचं दिग्दर्शन करावं अशी इच्छा राखीने व्यक्त केली आहे. 

राखी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. राखीने पती आदिलवर फसवणूक आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले होते. काही महिने आदिल तुरुंगातही होता. तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा राखी आणि आदिलमध्ये वाद सुरू झाला. 

टॅग्स :राखी सावंतसेलिब्रिटी