बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. यापूर्वी ती तिचा प्रियकर आदिल दुर्रानीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली होती. दोघेही अनेकदा मीडियासमोर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसले. पण आता राखी आणि आदिलने त्यांच्या नात्यात एक पाऊल पुढे टाकले आहे. राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांनी जगाच्या नजरेपासून लपून लग्न केले आहे. या जोडप्याने कोर्ट मॅरेज केले असून दोघांचा पहिला फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही गळ्यात हार घातलेले दिसत आहेत.
खरं तर, सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये राखीने पांढरा आणि गुलाबी रंगाचा शरारा परिधान केलेला दिसत आहे. तर आदिल त्याच्या सिंपल लूकमध्ये दिसत आहे. त्याने काळ्या शर्टसोबत डेनिम जीन्स घातली आहे. फोटोमध्ये दोघांनीही त्यांच्या कोर्ट मॅरेजचे प्रमाणपत्र हातात ठेवले आहे. तर दुसऱ्या चित्रात दोघेही त्यांच्या लग्नाच्या कागदपत्रांवर सही करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर राखी आणि आदिलचे हे फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. राखीला लग्नासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
राखी सावंतचे हे दुसरे लग्न आहे. तिने काही काळापूर्वी रितेश राजशी लग्न केले होते. अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तोपर्यंत राखीने रितेशचा चेहरा कोणालाही दाखवला नव्हता. मात्र, बिग बॉस १५ मध्ये रितेशनेही राखीसोबत एन्ट्री घेतली आणि त्यानंतर रितेशला पाहून लोक चकित झाले. राखीने शोमध्ये हे देखील उघड केले की रितेश आधीच विवाहित असल्याने तिचे आणि रितेशचे हे लग्न वैध नाही. त्याचवेळी शोमधून बाहेर आल्यानंतर राखीने रितेशसोबतचे संबंध तोडले, त्यानंतर ती आदिलला डेट करु लागली. आता दोघेही विवाहित आहेत.
दरम्यान राखी सावंत नुकतीच बिग बॉस मराठी ४च्या घरातून बाहेर पडली. घरी परतल्यानंतर तिला कळले की तिची आई आजारी आहे. याबद्दल राखीने सांगितले की, कॅन्सरनंतर तिची आई जया यांना ब्रेन ट्यूमर झाला आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीने हॉस्पिटलमधून रडत रडत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिची आई देखील पाहायला मिळत आहे.